hearday1.jpg
hearday1.jpg 
सोलापूर

विविध तपासण्याद्वारे ह्दयरोगाचे निदान करणे होते अधिक सोपे 

प्रकाश सनपूरकर

सोलापूर; हृदय रोगाच्या संदर्भात रक्त तपासणी प्रयोगशाळांच्या माध्यमातून हृदयदयरोगाचे निदान अधिक वेगाने व्हावे, यासाठी नागरिकांनी जागरुकतेने या तपासण्या करून घेण्याची गरज असते. हृदय रोग टाळण्यासाठी देखील या तपासण्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात असे मत ज्येष्ठ पॅथॉलॉजिस्ट डॉ. भारत मुळे यांनी व्यक्त केले. 

हृदय रोगाच्या संदर्भात होत असलेल्या तपासण्याबाबत डॉ. मुळे यांनी ही माहिती दिली. सध्या पॅथॉलॉजी प्रयोगशाळामध्ये अनेक महत्त्वाच्या तपासण्या होत असतात. शरीरात चरबी वाढल्यानंतर रक्तवाहिन्यामध्ये ही चरबी साठण्यास सुरवात होते. त्यासाठी कोलेस्टरॉल, हाय डेन्सीटी लिपीड, लो डेन्सीटी लिपीड, ट्रायग्लीसराईड व व्हीएलडीएल याही चाचण्यांचा समावेश आहे. या तपासण्यातून रक्तवाहिनीमध्ये चरबीचा थर जमा होतोय का हे समजू शकते. चरबीच्या थराने रक्तवाहिन्या या लवचिक न राहता कडक होतात. या तपासणीवरून रुग्णास हृदय रोग होण्याची संभाव्यता तपासली जाते. 

हृदय विकाराचा झटका येतो तेव्हा काही तातडीच्या चाचण्या केल्या जातात. त्यामध्ये ट्रॉप-टी, ट्रॉप आय व सीके-एमबी या चाचण्या महत्त्वाच्या असतात. छाती दुखण्याचा कारण हे स्नायू वेदना, हृदय किंवा गॅसेस यापैकी कोणते आहे, हे चाचण्याच्या निष्कर्षावरून डॉक्‍टरांना समजून घेता येते. त्यासाठी या चाचण्या उपयुक्त ठरतात. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर रुग्ण जर स्थिर झाला तर त्यानंतर एजजीओटी व एलडीएच या चाचण्या केल्या जातात. रक्तातील क्षार तपासले जातात. रक्तातील गॅस म्हणजे सीओटू व ओटू या दोन तपासण्या केल्या जातात. या शिवाय रक्तातील पोटॅशियम, क्‍लोराईड, सोडियम यांचे प्रमाण तपासले जाते. एखाद्याच्या कुटुंबात हृदय विकार हा अनुवांशिक असेल तर त्या व्यक्तीने लिपीड प्रोफाईल चाचण्या कराव्यात. 
हृदय विकाराचा झटका आल्यानंतर हृदययाच्या स्नायूचे नुकसान होऊन त्यातून ट्रोपोनिन हे प्रोटिन बाहेर पडते. हृदय विकाराच्या झटक्‍याच्या नंतर तीन ते चार तासात ते रक्तात सापडते तसेच दहा दिवसापर्यत त्याचे अस्तित्व आढळते. हृदय विकाराचा झटका आल्यानंतर एचएस-सीआरपी ही चाचणी केली जाते. हृदय विकारामध्ये त्याचे प्रमाण वाढलेले आढळते. हृदय विकाराच्या झटक्‍याची तीव्रता व निदानकामी प्रो-बीएनपी ही तपासणी उपयुक्त ठरते. हृदयाच्या स्नायुमध्ये आढळणारे मायोग्लोबिन हे प्रोटीन हृदयाला इजा झाल्यास वाढल्याचे तपासणीमध्ये आढळते. सर्वसाधारणपणे नागरिकांना स्वतःच्या प्राथमिक चाचण्या करून त्याचे निष्कर्ष सामान्य आहेत किंवा नाहीत याबाबत डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन हृदयाचे विकारापासून स्वतःचे संरक्षण करता येते असे नमुद केले. 


नेमके काय करावे 
डॉक्‍टरांच्या सल्ल्याने लिपीड प्रोफाईल चाचण्या करुन घ्याव्यात. तसेच रक्तातील शर्करा व क्रिएटीनीन चाचणी करावी. 
या तपासण्याचे निष्कर्ष डॉक्‍टरांना दाखवून त्यांचा सल्ला घ्यावा. 
कुटुंबात हृदयरोग आनुवांशिक असल्यास डॉक्‍टराचा सल्ला व तपासण्या आवश्‍यक. 
तपासण्यामध्ये संबंधित घटकाचे प्रमाण वाढल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला व पुढील उपचार करावेत. 
डॉक्‍टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधी, आहार व व्यायाम याबाबत सल्ला घेऊन जीवनशैलीत बदल घडवावा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT