सांगोला(सोलापूर) : तालुक्यातील डिकसळ परिसरातील म्हैसाळच्या बंदिस्त पाईपलाईनची पाहणी करत निधी शिल्लक असताना देखील कामाच्या दिरंगाईबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला.
13 किलोमीटरची बंदिस्त पाईपलाईन, नऊ कोटीचा निधी शिल्लक, परंतु ठेकेदारामुळे व अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने कामात दिरंगाई लागून डिकसळकरांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी व ठेकेदाराला श्रीकांत देशमुख यांनी जाब विचारला. परिसरातील लोहगाव जवळ्याकडे जाणाऱ्या बंदिस्त पाईपलाईनचे काम ठेकेदाराने रखडवलेल्या कामाचीही पाहणी केली. पुराचे अतिरिक्त पाणी जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानुसार टेंभू, म्हैसाळ व नीरा कालवा यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला देण्याचे सक्त आदेश आहेत.
सांगोला तालुक्यात म्हैसाळ, टेंभू, नीरेचे पाणी आलेले आहे. परंतु तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी कामे रखडल्याने हे पाणी अनेक गावांना पोहोचू शकत नाही. तालुक्यातील डिकसळ गावाला तसेच पुढे लोहगाव जवळ्याकडे तेरा किलोमीटरची बंदिस्त पाईप लाईन आहे. त्याच्या पुढे दहा किलोमीटर इतकी पाईपलाईन विखुरलेली आहे. या तेरा किलोमीटर मधील कामे मोठ्या प्रमाणात रखडल्याने लोकप्रतिनिधींनी याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या अनुषंगाने 13 किलोमीटर मध्ये रखडलेल्या कामाची पाहणी श्रीकांत देशमुख यांनी केली. बऱ्याच ठिकाणी लोखंडी सॉकेट जोडण्या रखडल्याने ही पाईपलाईन अपूर्णावस्थेत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सहाय्यक अभियंत्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची रखडलेल्या कामाबाबत चांगलीच कानउघडणी केली. येत्या चार ते पाच दिवसात ही सर्व कामे मार्गी लावतो असे सहाय्यक कार्यकारी अभियंता चोपडे यांनी सांगितले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे संचालक तुकाराम भुसनर, सांगोल्याचे माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, सरपंच शशिकला बाबर, मधुकर बाबर, विलास निळे, संजय निळे, आबासो करांडे, अमृत निळे, रावसाहेब निळे, बाळासाहेब कोरे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.