Sangola Lockdown 
सोलापूर

सांगोल्यात तिसऱ्या दिवशीही जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद; दुकाने बंद, रस्ते ओस 

दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : सांगोला शहर व तालुक्‍यात वाढत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सांगोला व ग्रामीण भागातील व्यापारी, नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गुरुवारी (ता. 17) तिसऱ्या दिवशीही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने शंभर टक्के कडकडीत बंद ठेवून जनता कर्फ्यूत सहभाग नोंदवला आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीत 15 ते 24 सप्टेंबर दरम्यान पूर्णपणे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरासह ग्रामीण भागात पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला व्यापारी व जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मेडिकल व दवाखाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. व्यापारी संघटनांनी सुद्धा नागरिकांना यात सहभागी होत प्रतिसाद देण्यास सांगितले. 

सोशल मीडियावरूनही जनजागृती करून कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाययोजना केली जात आहे. जनता कर्फ्यूदरम्यान शहरातील चौका - चौकांत पोलिस बंदोबस्त दिसून येत आहे. विशेष म्हणजे, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असतानाच रस्त्यावर दिसणाऱ्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. तसेच मास्क न वापरलेल्या लोकांना तोंडावर रुमाल बांधा व लवकरात लवकर घरी जाण्याबाबत समजावून सांगितले जात होते. तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. 

याबाबत सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सध्या तालुक्‍यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आल्यामुळे विनाकारण, बिगर मास्क बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येईल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT