kisan rail.jpg 
सोलापूर

किसान रेल्वेला शेतमाल वाहतुकीसाठी हवेत जादा थांबे आणी गोदामे 

संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : शेतकऱ्यांचा शेतीमाल पाठविण्यासाठी किसान रेल्वेस मोडनिंब येथे थांबा द्यावा. रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठवणुकीसाठी गोडावून (गोदाम) उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे केल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. 

रेल्वे मंत्रालयाने किसान रेल्वे सुरू केली आहे. शेतकऱ्यांना त्यांचा नाशवंत शेतीमाल लवकरात लवकर बाजारात पोचविण्यासाठी ही रेल्वे फायदेशीर ठरणार आहे. ही रेल्वे मोडनिंब (ता. माढा) या रेल्वे स्थानकावरुन जाते. माढा मतदारसंघातील मोडनिंब हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असून बाजारपेठेसाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मोडनिंब परिसरामध्ये फळबागांचे उत्पादन होते. 

प्रामुख्याने टोमॅटो, बोर, डाळिंब, लिंबू, द्राक्ष, पेरू व इतर पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या रेल्वेस मोडनिंब येथे थांबा नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी पाठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यांचा माल इतर मार्गाने विक्रीस पाठविल्यामुळे वाहतुकीसाठी जादा पैसे मोजावे लागत असून त्यांना चांगला दर देखील मिळत नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. मोडनिंब रेल्वे स्थानकावर शेतीमाल साठविण्यासाठी गोडावून उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्याकडून किसान रेल्वेस थांबा मिळण्यासाठी वारंवार मागणी केली जात आहे असेही त्यांनी सांगितले.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

Akola Rain : अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा; वीज पडून झाडाला लागली आग

SCROLL FOR NEXT