collector solapur 
सोलापूर

बोरामणी विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू

प्रमोद बोडके

सोलापूर : बोरामणी येथे साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 29 हेक्‍टर भूसंपादन आवश्‍यक आहे. या भूसंपादनासाठी खरेदीपूर्वी नोटीस बजावण्यात आली असून पुढील आठवड्यात आम्ही या जागेची पाहणी करणार आहोत. शेतकऱ्यांशी चर्चा करून खासगी वाटाघाटींद्वारे भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 
हेही वाचा - सोलापूर जिल्हा दूध संघाची मागणी फेटाळली 
विमानतळासाठी घेण्यात आलेल्या जमिनीपैकी 33 हेक्‍टर वन जमिनीचे निर्वनीकरण आवश्‍यक असून त्याबाबतचाही प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात आला आहे. बोरामणी येथील विमानतळ जलद गतीने कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. होटगी रोडवरील विमानसेवेला अडथळा ठरणाऱ्या सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय महापालिका आयुक्तांच्या अखत्यारितील आहे. या चिमणीबाबत आपण आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. 
हेही वाचा - सोलापूर स्मार्ट सिटीवर बुलडोझर! 
सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचा जातीचा दाखला सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अमान्य केला आहे. याप्रकरणी न्यायालयात फिर्याद दाखल करण्याचे आदेश समितीने अक्कलकोटच्या तहसीलदारांना दिले आहेत. दिलेला आदेश स्पष्ट असून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यामध्ये नव्याने काही सांगण्याची आवश्‍यकता नसल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT