latur bhairvnath sugar mill news esakal
सोलापूर

Latur : भैरवनाथ’ देणार ऊस दराची खुशखबर

कारखान्याच्या १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; मान्यवरांची उपस्थिती

सकाळ डिजिटल टीम

परंडा : भैरवनाथ साखर कारखाना ऊस दराबाबतची खुशखबर पुढच्या आठवड्यात देणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिली. रविवारी (ता. ३०) भैरवनाथ साखर कारखान्यांच्या १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके पृथ्वीराज सावंत, विक्रम सावंत, पोलिस अधिकारी आशिष खांडेकर, गजेंद्र सूर्यवंशी, राहुल डोके आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी संवाद साधताना चेअरमन प्रा. सावंत म्हणाले की, भैरवनाथ साखर कारखान्याच्या उभारणीनंतर या भागाचा विकास सुरू झाला आहे.

हा भाग वैभव संपन्न होत आहे. कारखाना प्रपंचाच्या कुटुबांच्या हिताच्या गोष्टी करण्याचे ठिकाण आहे. त्यामुळे राजकारणावर बोलणार नाही असे सांगून कारखान्यावर टीका करणारे कारखान्याच्या जीवावर मोठे झाल्याचे सांगायला चेअरमन प्रा सावंत विसरले नाहीत.

यापूर्वी दोन हजार ४०० रुपयाचा भाव साखर कारखान्याने दिला आहे. रिकव्हरी पेक्षा जास्त भाव देणे संयुक्तीक नाही असे सांगून पुढच्या आठवड्यात उस उत्पादक शेतकरी वर्गाला खुश करणार आहे. कारखान्याला चांगला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी द्यावा. कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही. असे चेअरमन पा. सावंत यांनी सांगितले कार्यक्रमासाठी उस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुभाष भोसले यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT