Latur saree news esakal
सोलापूर

Latur : लातूरची बाजारपेठ साड्यांनी सजली

ब्रॅण्डेड साड्यांना महिलांची पसंती

सकाळ वृत्तसेवा

लातूर : दिवाळी आली की महिलांच्या खरेदीला उधान येते. यात साड्यांची खरेदी तर महिलांसाठी दिवाळीचा सण अधिक महत्वाचा असतो. यातूनच साड्यांनी येथील बाजारपेठ सजली आहे. शहरातील साड्यांच्या दुकानात खरेदीसाठी सध्या महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यात ब्रॅण्डेड साड्यांना महिलांची पसंती राहत आहे.

यंदाही डिझायनर साड्या, पारंपारिक साड्या, कलकत्ता सिल्क, साऊथ पॅटर्न साड्यांना मोठी मागणी आहे. वेगवेगळ्या पैठणी साड्यांना महिला वर्गांची पसंती मिळत आहे. सॉफ्ट सिल्क, गढवाल सिल्क, कांजीवरम, दक्षिण सिल्क याशिवाय शालू, धर्मावरम, बनारस सिल्क, इरकल, सुरत सिल्क, पेशवाई, सिल्क टिश्यु, लेनन साड्या खरेदी करण्यावरही महिलांचा भर राहत आहे. घागरा खरेदी करण्याकडेही महिलांच कल आहे. पैठणी साडीला महिलांची विशेष पसंद राहत आहे. या साडीचा रंग, काठ हे आकर्षक असल्याने व पैठणी साड्या या खानदानी पेहराव असल्याने या साड्यांना महिला वर्गाची मोठी मागणी आहे.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या संकटानंतर या वर्षी महिलामध्ये उत्साह आहे. वेगवेगळ्या साड्यांना महिलांची पसंती असते. या वर्षी ब्रॅण्डेड साड्यांना महिलाची मागणी होत आहे. हजार रुपयापासून ते दोन अडीच लाखापर्यंत साड्यांच्या किंमती आहेत. वनग्रॅम चांदी सोन्याच्या साडी देखील महिला खरेदी करीत आहेत. पैठणी, ऑटोन्झा सिल्क, सॉफ्ट सिल्क अशांनाही महिलांची पसंती आहे.

- तुकाराम पाटील, द्वारकादास श्यामकुमार`, लातूर

दिवाळी म्हटले की महिला मोठ्या प्रमाणात साड्या खरेदी करतात. सध्या फॅन्सी कॉटन, लेनन, सिल्क टिश्यु, प्युअर सिल्क, धर्मावरम अशा साड्यांना महिलांची पसंती राहत आहे. दोन दिवसात ग्राहकांची अधिक रेलचेल सुरु होईल. दोनशे रुपयापासून पन्नास हजारापर्यंतच्या साड्यांच्या किंमती आहेत.

- अमित भुतडा,रुक्मिणी एक्सक्ल्युझिव्ह`, लातूर

वनग्रॅमच्या साड्या

या वर्षीच्या साड्यामध्ये वनग्रॅमच्या साड्यांचेही आकर्षण आहे. यात चांदी व सोन्याच्या वनग्रॅमच्या साड्या बाजारपेठेत विक्रीला आल्या आहेत. श्रीमंत महिलांची या साड्यांना अधिक पसंती राहत आहे. याच्या किंमती एक ते तीन लाखापर्यंत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT