1online_class.jpg 
सोलापूर

यामुळे झाली लॉकडाऊन नंतर मोबाईल विक्रीत वाढ 

प्रशांत देशपांडे

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या देशातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांनी ऑनलाइनद्वारे शिक्षण देण्यास सुरवात केल्याने स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या मोबाईलला जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. 
लॉकडाउनमुळे सर्वच मोबाईल कंपन्यांचे उत्पादन बंद होते. आता सुरू असले तरी 30 ते 40 टक्के कामगारांवर उत्पादन सुरू असल्याने ज्या प्रमाणात मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. तसेच सध्या भारतीय बनावटीच्या मोबाईलला जास्त मागणी आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा, महाविद्यालय, खासगी कोचिंग क्‍लासेस चालकांनी ऑनलाइनद्वारे शिक्षण देण्यास सुरवात केली असल्याने मोबाईलला मागणी वाढली आहे. मात्र, मोबाईलमधील काही पार्ट चायना बनावटीचे आहेत. यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पर्याय देणे गरजेचे आहे. लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून मोबाईलची सर्व दुकाने बंद असल्याने काही जणांचे चार्जर, बॅटरी आणि अतिवापरामुळे मोबाईल बंद पडले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठीही ग्राहकांची मोठी गर्दी सध्या बाजारात पाहावयास मिळत आहे. 

सरकारने चायना मोबाईला पर्याय द्यावा 
मोबाईलच्या क्षेत्रात सध्या हॅन्डसेटमधील काही पार्ट चायनाचे आहेत, तर काही भारतीय बनावटीचे आहेत. मात्र, भारतीय बनावटीच्या मोबाईलला जास्त मागणी आहे. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारने याबाबत विचार करून पर्यायी व्यवस्था करावी म्हणजे चायनाचे मोबाईल बाजारातून हद्दपार होतील. 
- महेश चिंचोळे, 
मोबाईल रिटेलरल असोसिएशन अध्यक्ष 

ऑनलाइन टिचींगमुळे मागणी जास्त 
सध्या ऑनलाइन टीचिंगमुळे मोबाईलला जास्त मागणी आहे. मात्र, लॉकडाउनमुळे मोबाईलचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद होत्या. त्यामुळे हॅन्डसेटचे उत्पादन झाले नाही. आता मागणी जास्त असली तरी पुरवठा कमी आहे. 
- पंकज फाटे, 
मोबाईल व्यावसायिक 

मार्यादित कामगार असल्याने उत्पादन कमी 
मोबाईलची मागणी जास्त आहे. मात्र, मोबाईल तयार करणाऱ्या कंपन्यांत सध्या 30 टक्के कामगारांवर काम चालू असल्याने पुरवठा कमी होत आहे. यामुळे हॅन्डसेटचा स्टॉक कमी झाला आहे. त्यामुळे बाजारात येणारे ग्राहक परत जात आहेत. 
- महम्मदजाफर शेख, 
मोबाईल व्यावसायिक 

 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT