राजकारणातील भीष्मपितामह तथा भाईंचा जीवनप्रवास Canva
सोलापूर

राजकारणातील भीष्मपितामह तथा भाईंचा जीवनप्रवास

राजकारणातील भीष्मपितामह तथा भाईंचा जीवनप्रवास

दत्तात्रय खंडागळे

गणपतराव देशमुख यांच्या जीवनप्रवासाचा हा आढावा.

सोलापूर : शांत, संयमी त्याला तात्विकतेची जोड, निष्ठा, चारित्र्य, सचोटी व प्रामाणिकपणा, सामान्यांच्या प्रश्नासाठी सतत झगडणारे राजकारणी, सर्व क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजेच शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख (Former MLA Ganapatrao Deshmukh) होते. विक्रमी अकरा वेळा आमदार असताना सुद्धा कोणत्याही प्रकारे बडेजाव न करता सतत जनसामान्यांसाठी त्यांच्या प्रश्नासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायासाठी ते सतत आवाज उठवत. अशा या ज्येष्ठ नेत्याचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या जीवनप्रवासाचा हा आढावा. (Life journey of former MLA Ganapatrao Deshmukh-ssd73)

गणपतराव देशमुख यांचा जीवनप्रवास

  • संपूर्ण नाव : गणपतराव अण्णासाहेब देशमुख

  • जन्म : 10 ऑगस्ट 1927

  • जन्मठिकाण : पिंपरी, ता. मोहोळ, जि. सोलापूर येथे आजोळी

  • शिक्षण : बी. ए. एलएल. बी.

  • पक्ष : भारतीय शेतकरी कामगार पक्ष

  • मतदार संघ : 253, सांगोला विधानसभा मतदार संघ

  • इतर माहिती...

  • 1950 - 54 : शेकाप पुरस्कृत विद्यार्थी सभेचे कार्यकर्ता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सहभाग

  • 1962 : विधानसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने प्रथमच भाई गणपतराव देशमुख यांना तिकीट मिळाले.

  • 1962 : शेकापकडुन गणपतराव देशमुख यांनी निवडणूक लढवुन कॉंग्रेसच्या केशवराव राऊत यांचा 2057 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश

  • 1965 : अन्नधान्य चळवळीत येरवडा जेलमध्ये स्थानबद्ध

  • 1967 : विधानसभेच्या निवडणुकीत काकासाहेब साळुंखे यांचा 672 मतांनी पराभव केला.

  • 1969-75 : सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शेतकरी सभा.

  • 1972 : कॉंग्रेसचे काकासाहेब साळुंखे-पाटील व 1995 मध्ये शहाजी पाटील यांच्याकडून पराभव

  • 15 मे 1969 : सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना

  • 1972 ते 1975 : काळात रस्ते वाहतूक मंडळाचे सदस्य.

  • 1975 : आणीबाणीच्या काळात खटला व तुरुंगवास.

  • 1977 : विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा.

  • 1980 ते 1982 : महाराष्ट्र विधानमंडळाच्या लोकलेखा समितीचे प्रमुख

  • 1990 व 2004 : काळात दोन वेळा विधानसभेचे हंगामी सभापती म्हणून काम पाहिले.

  • 9 नोव्हेंबर 2009 : महाराष्ट्राचे राज्यपालांकडून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती.

  • 1978 ते 1980 : शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये गणपतराव देशमुख कृषी, ग्रामीण विकास, विधी व न्याय खात्याचे मंत्री होते.

  • 1999 ते 2002 : आघाडी सरकारमध्ये ते पणन व रोजगार हमी खात्याचे मंत्री

  • 3 ऑगस्ट 2012 : शेकापला 65 वर्षे पूर्ण झाली. याच वर्षी आबासाहेबांच्या आमदारकीच्या कारकीर्दीला विधिमंडळात पन्नास वर्षे पूर्ण झाली.

  • 2019 : विधानसभा निवडणुक न लढविता नातु डॉ. अनिकेत देशमुख यांना शेकापकडुन उमेदवारी.

महाराष्ट्र विधानसभा सदस्य...

1662- 67, 1967-72, 1974-78, 1978-80, 1980-85, 1985-90, 1990-95, 1999-2004, 2004-09, 2009-14. 2014-19. महाराष्ट्र विधानसभेवर अकरा वेळा निवड.

मिळालेले पुरस्कार...

  • नवी दिल्ली : बेस्ट सिटीजन ऑफ इंडिया.

  • 2003 : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार

  • 2004 : सार्वजनिक वाचनालय, नाशिकचा कार्यक्षम आमदार म्हणून पुरस्कार मिळाला.

  • 2007 : गांधी फोरम संघटना दिल्लीचा 'आदर्श समाजसेवक पुरस्कार' मिळाला.

  • 29 जून 2009 : महाराष्ट्र शासनातर्फे 'जीवनगौरव पुरस्कार' भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळाला.

  • 2010 : महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या. मुंबई यांच्या वतीने 'वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार'

  • 30 मार्च 2014 : 'रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार'.

  • 26 एप्रिल 2017 : भारती विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने'जीवनसाधना गौरव पुरस्कार'.

  • 2 डिसेंबर 2018 : अग्निपंख फाउंडेशनतर्फे 'डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जीवन गौरव पुरस्कार'.

  • 13 नोव्हेंबर 2020 : किसन वीर सहकारी साखर कारखाना, सातारा यांच्या वतीने 'आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार'.

परदेश प्रवास...

  • 1979 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने संयुक्त अरब अमिराती, कुवेत, सौदी अरेबिया व लिबीयाचा अभ्यास दौरा.

  • 2008 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या वतीने चीन, हॉंगकॉंग, व्हिएतनामचा अभ्यास दौरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs SL 2ndT20I : झिम्बाब्वेने इतिहास रचला, श्रीलंकेला १४.२ षटकांत हरवले; सिकंदर रझाने सूर्यकुमार, विराटचा विक्रम मोडला

गणेशभक्तांनो निश्चिंत व्हा! गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लाखोंचा जनसागर, मुंबई लोकलने आखली विशेष रणनीती

Ganpati Visarjan 2025 Live Updates : मुंबईत दुपारी ३.०० वाजेपर्यंत २,१९८ गणेश मूर्तींचे विसर्जन

Pune Ganesh Visarjan 2025 : चाकण परिसरात गणेश विसर्जनाच्या वेळी चार जणांचा दुर्दैवी बळी

Latest Maharashtra News Updates : इचलकरंजीत सकाळ माध्यम समुहातर्फे तंदुरूस्त बंदोबस्त उपक्रम

SCROLL FOR NEXT