2Labour_with_Family. 
सोलापूर

मोठी बातमी ! लॉकडाउनमुळे अडकले 64 हजार 926 विस्थापित

तात्या लांडगे

सोलापूर : देशात लॉकडाउनने राज्यात विविध जिल्ह्यांत अन्य राज्ये व जिल्ह्यांतील मजूर अडकले आहेत. त्यांच्या राहण्याची, जेवणाची अद्याप सोय करण्यात आलेली नव्हती. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी (ता. 30) आपत्ती व्यवस्थापन समितीच्या राज्य कार्यकारणीची बैठक घेतली. त्यात 64 हजार 926 कामगारांसाठी 214 निवारागृहे उभारली जाणार असून त्यासाठी 45 कोटींचा निधी मंजूर केला आहे.

हेही नक्‍की वाचा : शिवभोजनामुळे सोलापुरातील 750 जणांना मिळाला आधार


कोरोना वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला देशात लॉकडाउनची घोषणा केली. प्रारंभी 31 मार्चपर्यंत लॉकडाउन असल्याचे स्पष्ट केले. मात्र, त्यात बदल करून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन असल्याचे जाहीर केले. कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी खंडित करण्याच्या हेतूने गर्दी होणार नाही याची दक्षता घेत आहे. पोलिस नागरिकांना नियंत्रणात आणत आहेत. बहुतांश नागरिक घरातच लॉकडाउन आहेत, परंतु कामानिमित्त अन्य जिल्ह्यात किंवा राज्यात गेलेले कामगार तेथेच अडकले आहेत. त्यांना राहण्याची व जेवणाची सोय नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्‍वभूमीवर अशा कामगारांसाठी राज्य सरकारने 45 कोटींची मदत जाहीर केली आहे. त्यातून त्यांच्यासाठी निवारागृहे उभारली जाणार असून तेथे अन्नधान्य दिले जाणार असून काहींना भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात स्वच्छतागृहेही उभारली जाणार आहेत.

 

हेही नक्‍की वाचा : बालकामगार अन्‌ बालगृहातील मुले उपाशीपोटी




विभागनिहाय मिळालेला निधी
कोकण : 15 कोटी
पुणे : 10 कोटी
नाशिक : पाच कोटी
नागपूर : पाच कोटी
अमरावती : पाच कोटी
औरंगाबाद : पाच कोटी

हेही नक्‍की वाचा : सकाळ ब्रेकिंग ! एमपीएससीसह विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या


जिल्हानिहाय निवारागृहे अन्‌ विस्थापितांची आकडेवारी
आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय कार्यकारणी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला 45 कोटींचा निधी तत्काळ संबंधित विभागांना वितरीत करण्यात आला आहे. आता कोणत्या जिल्ह्यात किती विस्थापित व अन्य राज्यांतील मजूर आहेत, त्यानुसार त्यांच्यासाठी निवारागृहे उभारली जाणार आहेत. राज्य सरकारने दिलेला निधी खर्चाची जबाबदारी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर असेल. सोलापूर जिल्ह्यात दोन निवारागृहे होणार असून त्याठिकाणी 62 जणांची सोय केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यातील 12 हजार 460 नागरिकांसाठी 42 निवारागृहे तर सातारा जिल्ह्यात सर्वाधिक 143 निवारागृहे उभारली जाणार असून त्याठिकाणी चार हजार 688 नागरिकांची सोय केली जाणार आहे. सांगलीत 16 निवारागृहे होणार असून एक हजार 306 जणांची सोय केली जाईल. कोल्हापुरात 11 निवारागृहे होणार असून 46 हजार 410 विस्थापितांची सोय केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vehicle Green Tax: महाराष्ट्रात वाहनधारकांना मोठा धक्का! वाहनांवर ग्रीन टॅक्स वाढणार; नवीन कर रचना किती? जाणून घ्या...

Akola Unseasonal Rain : अकोल्यात अवकाळी पावसासह गारपीट; पिकांना फटका

Nanded News : अर्धापूरात गारपीट व वादळी वाऱ्याचा तडाखा; केळी, टरबूज, गहू, आंबा पिकांचे मोठे नुकसान

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

SCROLL FOR NEXT