Sand 
सोलापूर

व्होळे येथे अवैध वाळू उपशाविरोधात मोठी कारवाई; 70 ब्रास वाळूसह जप्त केला लाखो रुपयांचा मुद्देमाल 

भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) ः व्होळे (ता. पंढरपूर) येथे आज अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात धाडसी कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 70 ब्रास वाळूसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मागील काही महिन्यांतील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे मानले जाते. दरम्यान, अवैध वाळू उपसा आणि वाहतूक कोणाच्या आश्रयाने सुरू होती, याची देखील चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. 

मागील काही दिवसांपासून पंढरपूर तालुक्‍यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांत वाळू माफियांनी धुमाकूळ घातला होता. दिवसाढवळ्या अवैध वाळू चोरी सुरू असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तक्रारींची दखल घेऊन येथील प्रांताधिकारी श्री. ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाळू चोरी विरोधी पथकाने व्होळे व परिसरात मोठी कारवाई केली. कारवाई दरम्यान एक जेसीबी, तीन टिप्परसह लाखो रुपयांची 70 ब्रास वाळू जप्त केली आहे. या प्रकरणी आठ वाळू चोरांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. 

तालुक्‍यातील व्होळे, कौठाळी, शिरढोण, शेगाव दुमाला, मुंढेवाडी, अजनसोंड, सुस्ते या भागात मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे. पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी पात्रातून देखील मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी सुरू आहे. वाळू चोरी विरोधात अनेक सामाजिक संघटनांनी प्रांताधिकारी श्री. ढोले यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची दखल घेऊन प्रांताधिकाऱ्यांनी आज विविध भागातील अवैध वाळू साठ्यांवर कारवाई केली आहे. अन्य भागात देखील वाळू विरोधी पथकाने उशिरापर्यंत कारवाई केली. मंडल अधिकारी एस. ए. मुजावर, तलाठी राजेंद्र वाघमारे, दीपक शिंदे, समाधान शिंदे यांनी ही कारवाई केली. 

या कारवाईबाबत प्रांताधिकारी सचिन ढोले म्हणाले, आज दुपारी व्होळे व परिसरात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान एक जेसीबी, तीन टिप्पर आणि 70 ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार आहे. तालुक्‍यातील अन्य भागात देखील अशीच कारवाई केली जाणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT