Swab Tasting. 
सोलापूर

"या' तालुक्‍यात सापडले नव्याने तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकूण रुग्णसंख्या झाली सहा 

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : तालुक्‍यामध्ये नव्याने तीन रुग्ण वाढले असून, शहरामध्ये एका 35 वर्षीय महिलेचा व बोराळे येथील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्‍यातील रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. तालुक्‍याच्या सीमा बंद केल्या. 

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर दोन दिवसांपूर्वी बोराळे येथील रुग्ण बॅंक कामासाठी सोलापूरला गेल्यानंतर तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांपैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून, दोघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. तर आज नव्याने नागणेवाडीतील महिला इचलकरंजी येथे जाऊन मंगळवेढ्यामध्ये परत आल्यानंतर तिला त्रास होऊ लागल्याने मंगळवेढ्यात उपचार घेऊन पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आल्यानंतर तिचा अहवालही पॉझिटिव्ह आला. यामुळे तिच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. 

दरम्यान, सध्या शहराच्या सीमा प्रशासनाने सील केल्या असून, अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी देखील शहरामध्ये कारवाई मोहीम आणखी तीव्र करत दंडाची वसुली सुरू केली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामपंचायतींनी बिगर मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम सुरू करून दंडाची रक्कम आकारण्यास सुरवात केली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT