Many roads in Madha taluka have been closed due to heavy rains.jpg 
सोलापूर

माढा तालुक्यातील अनेक रस्ते बंद; कुर्डुवाडीत विक्रमी पाऊस

किरण चव्हाण

माढा (सोलापूर) : माढा तालुक्यात बुधवारी (ता. १४) सरासरी १०६.९१ मिलीमीटर पाऊस झाला असून कुर्डुवाडीत विक्रमी १८४.६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. माढा तालुक्यात सर्वत्र पावसाने हाहाकार केला आहे. माढा वैराग वाहतूक उंदरगावनजीक सिना नदीवरील पुलावर पाणी आल्याने बंद झाली आहे. माढा तालुक्यातील अनेक रस्ते बंद आहेत.

माढा - बार्शी, माढा - वैराग, माढा - कुर्डूवाडी यासह इतरही रस्ते पावसाच्या पाण्यामुळे बंद आहेत. माढा - शेटफळ, बार्शी - कुर्डुवाडी, कुर्डुवाडी - पंढरपूर, कुर्डूवाडी - टेंभूर्णी वाहतूक‌ सध्या सुरू झाली आहे. उंदरगाव, लोंढेवाडी, कुर्डूवाडी, माढा, लऊळ या गावांतील व्यापारी गाळे व काही ठिकाणी घरातही पावसाचे पाणी शिरले आहे. सिना नदीवरील उंदरगावचा पुल पाण्याखाली गेल्याने माढा - वैराग रस्त्याची वाहतूक बंद आहे. सिना नदीचे पाणी उंदरगाव, वाकावमधील काही घरात शिरले आहे.

नदीकाठच्या दारफळ, सुलतानपूर, निमगाव, उंदरगाव, केवड, वाकाव या गावांतील शेतीला व काही प्रमाणात निवासी भागाला पावसाचा फटका‌ बसला आहे. रात्री‌ सिना नदीच्या पुराच्या पाण्याने कमाल पातळी‌ गाठली होती. सकाळपासून पाणी थोडेफार ओसरण्यास‌‌ सुरूवात झाली आहे. बेंद ओढ्याला पाणी आल्याने माढा - बार्शी रस्ता बंद आहे. तर माढा - कुर्डूवाडी रस्त्यावरून केवळ मोठी वाहनेच जाऊ शकतात, अशी परिस्थिती आहे. 

माढा तालुक्यात बुधवारी सरासरी मिलीमीटर पाऊस झाला. तालुक्यात मंडळनिहाळ झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये - माढा -  85.6, कुर्डुवाडी - 184.6, टेंभुर्णी - 78, रांझणी - 105, दारफळ - 110, म्हैसगाव - 126.2  रोपळे (कव्हे ) - 127, लऊळ - 65.4, मोडनिंब - 80.4.

चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सिनेला मोठा पूर

सिना नदीला यापूर्वी २००७ साली पूर आला होता. त्यावेळीही पुलावरून पाणी गेले होते. पण २००७ पेक्षाही यावर्षी आलेले पाणी खूप जास्त असून मागील ४०-४५ वर्षांत पहिल्यांदाच एवढा मोठा पूर आल्याचे उंदरगावातील वरिष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया? अमित ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करत सगळंच सांगितलं...

Pune Youth Murder in College Campus : पुण्यात खळबळ!, सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा तरूणाची कोयत्याने वार करून हत्या

Sheikh Hasina: शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; भारत आता त्यांना परत बांगलादेशात पाठवणार का? जाणून घ्या नियम...

Latest Marathi Breaking News:आदित्य ठाकरेंनी ट्विट करत केलं अमित ठाकरेंचं समर्थन

Kolhapur News: गोकुळच्या लिंगनूर कार्यक्रमात ‘लाडकी बहीण’ वरुन रंगले कलगीतुरे

SCROLL FOR NEXT