zendu.jpg 
सोलापूर

पावसाने नुकसान झाल्यानंतर कमी आवकीने झेंडुचे दर वाढले 

राजाराम माने

केतूर ः खंडेनवमी व दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर केतूर (ता. करमाळा) बाजारपेठेत झेंडूची फुले 140 ते 150 रुपये किलो दराने विकला जात होती. 
सततच्या पावसामुळे झेंडू पीक मोठ्या प्रमाणावर खराब झाले आहे त्यातून वाचलेल्या पिकाला मात्र चांगला दर मिळत आहे यावर्षी प्रथमच आवक कमी आणि मागणी जास्त त्यामुळे झेंडूचे दर मात्र उच्चांकी दरावर गेले आहेत. 

यंदाचे वर्ष व्यापाऱ्यासह शेतकरी वर्गालाही कठीण व संकटाचेच जात आहे. कोरोना महामारी व लॉकडाउनच्या संकटामुळे व्यापारी वर्गाला तोटा सहन करावा लागला तर आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर संकट आले आहे,यातच धार्मिक स्थळे अजूनही बंदच असल्याने त्याचा मोठा फटका फुल उत्पादकांना बसला आहे. 

यातच अतिवृष्टी मुळे सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे त्याचा परिणाम फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली असल्याने फुलांचे दर मात्र वाढले आहेत.जिल्ह्यात दसरा दिवाळी पूर्वी फुले बाजारात येतात यंदा नवरात्र व त्यापूर्वी सर्वत्र जोरदार पावसाने सत्कार हजेरी लावल्याने फुलांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली त्यामुळे आलेली पीक वाया गेले सध्या पुराना चांगला दर मिळत असला तरी शेतकऱ्याकडे मात्र फुलेच उपलब्ध नाहीत. 

आवक घटली 
"अतिवृष्टीमुळे फुलांची आवक घटली असल्याने दसरा सणासाठी झेंडूची फुलेच कमी प्रमाणात विक्रीसाठी बाजारात आली त्यामुळे दर वाढले" 
-किरण गुलमर,फुल विक्रेता,केतूर 

खरेदी केली कमी 
"केवळ औपचारिकता म्हणून यावर्षी पूजेसाठी दरवर्षीप्रमाणे जास्त न घेता थोडीच फुले खरेदी केली". 
- दिनेश माने,व्यापारी,केतूर 

बाजारात कमी फुले विक्रीसाठी 
"पावसामुळे या वर्षी फुलांचा हंगाम वाया गेला राशीन,करमाळा येथील बाजारपेठेतून 120 ते 130 रुपये दराने ठोक फुले खरेदी केली असल्याने ही फुले 150 रुपये किलो दराने किरकोळ विक्री केली. दर जास्त असल्याने व पावसामुळे पुढे खराब होणार असल्याने कमी प्रमाणात फुले विक्रीसाठी आणली होती" 
--अल्ताफ बागवान,फूल विक्रेता,केतूर 

वाहनाच्या पूजेसाठी वापर 
"दरवर्षी 30 ते 40 रुपये किलो दराने मिळणारी फुले यावर्षी मात्र 150 रुपये किलो दराने घ्यावी लागत असल्याने व्यवसायिकांनी आपल्या दुकानातील बोर्डवर हार करणे टाळले तर चारचाकी,दुचाकी वाहन धारकांनीही फक्त आपल्या वाहनांच्या पूजेसाठी फुलांचा वापर केला व फक्त पूजेसाठी लागतील एवढीच मर्यादित फुले खरेदी केली" 
- शहाजी पाटील,नागरिक,केतूर  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सौदी अरेबियाच्या संरक्षणासाठी पाकिस्तान 'येमेन'मधील हुथी बंडखोरांवर एअरस्ट्राईक करण्याच्या तयारीत; करार काय सांगतो?

Karmad News : आईच्या मामाच्या गावाला आलेल्या एकुलत्या एक मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

EPF Advance Rules : पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत? आधी समजून घ्या नियम, कोणाला किती रक्कम मिळणार?

Marathi News Live Updates : भारत अन् श्रीलंकेत संरक्षण क्षेत्रातील तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

Pune News : नैरोबीच्या महिलेला मिळाले पुण्‍यात जीवदान! अकरा शस्त्रक्रिया, अन्‌ परदेशी महिलेची मृत्यूशी झुंज यशस्‍वी

SCROLL FOR NEXT