crocodile 
सोलापूर

ब्रेकिंग! सोलापुरातील देगावच्या ओढ्यातील मगरींना पकडण्यासाठी ठरला "हा' प्लॅन

तात्या लांडगे

सोलापूर : देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यात दोन मगरी आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साडेतीन-चार फुटांची एक, तर दुसरी आठ ते दहा फुटांची मगर असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आता या मगरींना पकडण्यासाठी बोटीचा वापर करणे, इंजेक्‍शन देऊन पकडणे, मासे पकडण्याची जाळी लावणे आणि एका खोल खड्ड्यात आणून पकडणे, असे चार पर्याय समोर आले आहेत. ओढ्याची स्थिती पाहता चौथ्या पर्यायानुसार मगरींना पकडण्याचे नियोजन वन विभागाकडून सुरू झाले आहेत. 

महागडे इंजेक्‍शन देऊन मगरीला पकडण्याचा पर्याय विचाराधीन होता; मात्र ओढ्यात अस्वच्छ पाणी असल्याने इंजेक्‍शन देणे मगरींच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. ओढ्याच्या कडेचा भाग दलदलीचा असल्याने त्या ठिकाणी जाळी लावल्यास मगरीच्या ताकदीने तो प्रयोग यशस्वी होणार नाही, असे वन विभागाला वाटते. दरम्यान, मगरींच्या वास्तव्याची तीन ठिकाणे वन विभागाने शोधून काढली असून तिन्ही ठिकाणे शंभर मीटर परिसरातील आहेत. त्यामुळे तिन्ही ठिकाणांतून मध्यवर्ती भाग निश्‍चित करून ओढ्याच्या कडेला खोल खड्डा खोदून मगरीला पकडण्याचा पर्याय वन विभागाकडून निश्‍चित केला जाणार आहे. तत्पूर्वी, वाईल्ड लाईफच्या तज्ज्ञांकडून मगरीच्या सवयी, तिच्या हालचालींची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार आता मगरीला पकडण्यासाठी सापळा लावण्यात आल्याचे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

मगरी आल्या कुठून? शोध लागेना 
पाच-सहा वर्षांपूर्वी आणि मागच्या वर्षी शहर परिसरात जोरदार पाऊस पडला होता. त्या वेळी पाण्याच्या प्रवाहाच्या माध्यमातून बाहेरील त्या मगरी देगाव ओढ्यात आल्याचा अंदाज प्राणिसंग्रहालयाचे संचालक नितीन गोटे यांनी व्यक्‍त केला. महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील सर्व मगरी सुरक्षित असून एकही मगर बाहेर गेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या मगरी त्या ठिकाणी आल्या कुठून? याचा ठोस तपास अद्यापही लागलेला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT