होम कॉरंटाईन Media Gallery
सोलापूर

होम आयसोलेशनमधील "तो' रुग्ण सापडलाच नाही ! उपचार करणारे डॉक्‍टरांचे तोंडावर बोट

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शोधूनही होम आयसोलेशनमधील रुग्ण सापडला नाही

तात्या लांडगे

होम आयसोलेशनची परवानगी दिलेला रुग्ण त्याच्या घरी नसल्याबद्दलचा व्हिडिओ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना पाठवला. तरीही आयुक्त गप्पच बसले.

सोलापूर : येथील किल्ला बागेसमोरील एका कोरोनाग्रस्त (Covid-19) रुग्णाला साबळे नागरी आरोग्य केंद्राने होम आयसोलेशनची (Home isolation) परवानगी दिली. त्या रुग्णाच्या घरी जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली शेंडगे यांनी शोध घेतला. मात्र, त्या ठिकाणी रुग्ण नसल्याचे समोर आले. त्यानंतर त्या रुग्णावरील उपचाराची जबाबदारी घेतलेल्या डॉक्‍टरानेही तोंडावर बोट ठेवत रुग्ण कुठे आहे, याची माहिती नसल्याचे उत्तर दिले. नातेवाईक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वाद फौजदार चावडी पोलिस ठाण्यापर्यंत (Faujdar Chawdi Police Station) गेला. (Medical officers searched but could not find the patient in the home isolation)

शहरात सध्या सहा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मात्र, बरेच रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असूनही त्यांची नोंद आरोग्य विभागाकडे नसल्याची चर्चा आहे. शहरात रुग्णसंख्या कमी होत असतानाच अशा बेजबाबदारपणामुळे पुन्हा रुग्णवाढीची भीती व्यक्‍त केली जात आहे. दरम्यान, शहरातील जवळपास 28 हजार रुग्णांपैकी साडेतेराशेहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरातील प्रभाग क्रमांक 22 ते 24 मध्ये रुग्णवाढ मोठी असतानाही महापालिकेकडून काहीच कार्यवाही केली जात नसल्याचीही वस्तुस्थिती आहे.

होम आयसोलेशन केल्यानंतर संबंधित रुग्ण त्या ठिकाणी व्यवस्थित उपचार घेत नाही, कोरोनाचे नियम पाळत नसल्याचा अनुभव अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांना आला आहे. अनेकदा संबंधित नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका होम आयसोलेशनमधील रुग्णाच्या घरी गेल्यानंतर त्यांना रुग्णाची भेट घालून दिली जात नसल्याचीही वस्तुस्थिती आहे. या पार्श्‍वभूमीवर 15 नागरी आरोग्य केंद्रांपैकी बहुतेक केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होम आयसोलेशन बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र, आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यावर काहीच ठोस निर्णय घेतलेला नाही, असेही सांगण्यात आले. शेवटी, त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पोलिस ठाणे गाठले.

"तो' रुग्ण नेमका आहे तरी कुठे?

ग्रामीण भागात होम आयसोलेशनमधील रुग्णाच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी होम आयसोलेशनमधील रुग्ण कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्याची कार्यवाही तातडीने सुरू केली. तशीच परिस्थिती शहरातही आहे, तरीही आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी त्यासंबंधीचा निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, किल्ला बागेसमोरील तो रुग्ण विनीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ते हॉस्पिटल गाठले आणि तेथील नोंदवह्या तपासल्या. मात्र, तिथेही रुग्ण उपचारासाठी आला नसल्याचे दिसून आले. नातेवाइकाला पुन्हा विचारले की, रुग्ण कुठे आहे. तरीही, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यासंबंधीचा व्हिडिओ आयुक्‍तांना पाठविण्यात आला. मात्र, त्यावर पुढे काहीच कार्यवाही झाली नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

उपायुक्‍त म्हणाले, होम आयसोलेशन बंद

सैफुल परिसरातील एका 32 वर्षीय महिलेला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर 11 दिवसांनी त्या महिलेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. त्यानंतर सर्वोपचार रुग्णालयात त्या महिलेचा 24 मे रोजी मृत्यू झाला. यावर "सकाळ'ने प्रकाश टाकला होता. त्यानंतर शहरातील कोणत्याही रुग्णाला यापुढे होम आयसोलेशनला परवानगी दिली जाणार नाही, असे महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी सांगितले. मात्र, त्यासंबंधीचा कोणताही लेखी आदेश निघाला नसल्याने वैद्यकीय अधिकारीदेखील संभ्रमात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT