सोलापूर

सोलापूरवर अन्याय का? लशीच्या तुटवड्याबाबत आमदार परिचारक आक्रमक

अभय जोशी - सकाळ वृत्तसेवा

आमदार श्री. परिचारक म्हणाले, पुणे विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला अत्यंत कमी लसीचा पुरवठा केला जात आहे.

पंढरपूर (सोलापूर) : पुणे विभागासाठी मागील आठ दिवसात सुमारे दोन लाखाहून अधिक लस मिळाल्या, परंतु त्यातून सोलापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीसाठी देखील लस मिळू शकली नाही. अशा परिस्थितीमुळे जिल्ह्यातील लसीकरण यंत्रणा ठप्प झाली आहे. या प्रकाराकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना सोबत घेऊन जिल्हाधिकार्‍यांना भेटणार आहे, अशी माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली. (MLA prashant paricharak said that very little vaccine is being supplied to solapur district)

आमदार श्री. परिचारक म्हणाले, पुणे विभागातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला अत्यंत कमी लसीचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या आठ दिवसापासून तर जिल्ह्यातील लसीकरण यंत्रणा पूर्णपणे ठप्प झाली असल्याने ज्येष्ठांसह तरूणांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांनी पहिला डोस घेवून तीन महिने उलटून गेले आहेत, परंतु अद्याप त्यांना लस मिळू शकलेली नाही. त्यामुळे नागरिक अस्वस्थ झाले आहेत.

केंद्राकडून राज्यास मंजूर लसीचे विभागानुसार वाटप होत आहे. पुणे विभागास मागील आठवड्यात २ लाखाहून अधिक लस प्राप्त झाल्या. या पैकी सव्वा लाख एकट्या पुणे जिल्ह्यास, ३० हजार कोल्हापूर जिल्ह्यासाठी, २५ हजार सातारा तर २० हजार सांगली जिल्ह्यासाठी पाठवण्यात आल्या. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एकाही व्यक्तीसाठी लस पाठवण्यात आली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. यापूर्वी जिल्ह्यासाठी १२ ते १३ हजार लस प्राप्त होत असत. यातून प्रत्येक तालुक्याच्या वाट्याला एक हजाराच्या आसपास लस मिळत होती.

लसीकरणाबाबत सोलापूर जिल्ह्यावर सातत्याने दुजाभाव केला जात आहे. यापूर्वी देखील लस व रेमडेसिवीर इंजक्शन साठी आम्हाला सर्वांना आंदोलन करावे लागले होते. आता पुन्हा जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांशी आपण संपर्क साधत असून जिल्हाधिकारी यांना भेटून शासनाचे लक्ष वेधणार आहे असे आमदार श्री. परिचारक यांनी सांगितले.

आमदार श्री. परिचारक म्हणाले, आषाढी यात्रा जवळ आलेली असल्यामुळे पंढरपूर शहरात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्याची गरज आहे. असे असताना लसच उपलब्ध होत नसल्याने यंत्रणा ठप्प झाली आहे. यात्रेच्या वेळी पंढरपुरात भाविकांना येण्यास बंदी केलेली आहे. यात्रा काळात पंढरपुरात प्रवेश मिळू शकणार नसल्याने आतापासूनच पंढरपुरात येऊन संत नामदेव पायरीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी भाविक येऊ लागले आहेत. येत्या काही दिवसात भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन पंढरपुरात जलदगतीने लसीकरण मोहीम राबून सर्वांचे लसीकरण करणे गरजेचे आहे.

एकीकडे लसीकरण ठप्प असताना शहर व तालुक्यात कोरोनाच्या टेस्ट देखील कमी संख्येने केल्या जात आहेत. यापूर्वी दिवसाला एक हजारहून अधिक कोरोना टेस्ट केल्या जात होत्या. परंतु सध्या दररोज सुमारे २०० ते २५० टेस्ट केल्या जात आहेत. टेस्ट कमी झाल्या असताना तालुक्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट १४ टक्के वरून २४ टक्के पर्यंत जाणे अत्यंत गंभीर असून भविष्यात रूग्णांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनीही आगामी काळात काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार श्री. परिचारक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT