पालकमंत्री भरणेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : आमदार शहाजी पाटील Canva
सोलापूर

पालकमंत्री भरणेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : आमदार शहाजी पाटील

पालकमंत्री भरणेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : आमदार शहाजी पाटील

दत्तात्रय खंडागळे

बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळ ठेवू नये, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनी केली.

सांगोला (सोलापूर) : पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Guardian Minister Dattatraya Bharane) यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द वापरले, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. आमच्या नेत्यावर अपशब्द वापरल्यास त्याला तोडीस तोड भाषा आमच्याकडे आहे. असे बेताल वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळ (Cabinet) ठेवू नये, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, अशी मागणी सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील (MLA Shahaji Patil) यांनी केली.

सोलापूर येथील एका कार्यक्रमामध्ये सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. याची दखल घेत सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य करणे अतिशय दुर्दैवी गोष्ट असून, अशा पद्धतीने आमच्या नेत्यावर, आमच्या पक्ष प्रमुखांवर अपशब्द कोणी वापरले तर त्याला तोडीस तोड भाषा आमच्याकडे आहे. आमची तोफ आम्ही डागायला सुरवात केली, आम्ही आग ओकायला सुरवात केली तर भरणेच काय तर त्यांच्या नेत्यांना पळवून लावण्याएवढी आग आमच्या शिवसैनिकांच्या छातीत भरली आहे.

परंतु सध्याचे आघाडीचे सरकार आहे आणि हे सरकार चालवत असताना कुठल्याही शिवसैनिकांनी मित्रपक्षांवर, नेत्यांवर अपशब्द बोलायचे नाही, असा आदेश आमचे नेते उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आमची संस्कृती आम्ही जतन करत आहोत, परंतु पालकमंत्र्यांच्या वाक्‍याचा आम्ही निषेध तर करतोच परंतु मी स्वतः मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार यांच्याकडे जाऊन अशा लोकांना मंत्रिमंडळात ठेवणे हे गैर आहे, अशा नेत्याला मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी करणार आहे. आणि त्यांनी जर पालकमंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले नाही तर आम्हाला पुढचे पाऊल उचलावे लागेल, असा इशाराही आमदार शहाजी पाटील यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT