अटक sakal
सोलापूर

Solapur News : खोटया विवाह प्रकरणातील तीन संशयतांना मोहोळ पोलिसांनी केली अटक

शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी

राजकुमार शहा

मोहोळ : देगाव ता मोहोळ येथील खोट्या विवाह प्रकरणातील फरार असलेल्या तीन संशयतांना मोहोळ पोलिसांनी अटक केली असून, यातील संशयीतांची संख्या आता सात झाली आहे. अटक केलेल्या तिघांना पोलिसांनी न्यायालया समोर उभे केले असता त्यांना शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. विशाखा श्रीकृष्ण छापानी, शैलेश रामचंद्र राऊत दोघे रा अमरावती तर विवाह जुळवणारा एजंट गंगाधर लाडबा ढेरे रा नांदेड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापूर्वी निर्मला बाविस्कर रा उल्हासनगर, लता पदक रा राजौरा, पिंकी अशोक ढवळे रा उल्हासनगर, लता धनराज चव्हाण रा डोंबिवली यांना अटक केली आहे. त्यांची गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी ची मुदत आहे.

मोहोळ पोलिसां कडून मिळालेल्या माहिती नुसार, देगाव येथील नितीन भोसले यांचा थोरला भाऊ सचिन याचा विवाह जमत नव्हता. नितीन ने त्याच्या मावस भावाला सचिनला मुलगी पाहण्यास सांगितले. मावस भावाने नितीनला एजंट गंगाधर ढेरे यांचा मोबाईल नंबर दिला. त्यावर नितीन ने संपर्क साधून विवाह संदर्भात बोलणे झाली ठरल्या प्रमाणे रक्कम देऊन विवाह ही झाला. मात्र काही दिवसातच शैलेश राऊत याचा नितीन भोसले यांना फोन आला व घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे मुलीला घेऊन या व कार्यक्रम झाला की पुन्हा घेऊन जा. या बोलण्यावर नितीन यांनी विश्वास ठेवून सचिनची नवीन बायको व वडिलांना लक्झरीने पाठविले. ते दोघे सकाळी नागपूर हायवेवर उतरले. त्यावेळी शैलेश हा त्या ठिकाणी आला होता. दोघांना रिक्षाने घेऊन शैलेश बस स्थानकावर आला.

त्यावेळी मुलीने लघुशंकेचा बहाना करून निघून गेली, तर शैलेश ने आपल्याला न्यायला गाडी आली का ते पाहतो असे म्हणून तोही निघून गेला. केवळ नितीन चे वडील राहिले. बराच वेळ वाट पाहिल्या नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले, ते परत गावी आले. दरम्यान नितीन भोसले यांनी मोहोळ पोलिसात तक्रार दिली त्यानंतर मोहोळ पोलिसांनी या प्रकरणातील चौघींना अटक केली तर उर्वरित तिघेजण फरार होते मोहोळ पोलिसांचे पथक अमरावती येथे गेले त्या ठिकाणी अमरावती पोलिसांच्या मदतीने तसेच निर्मला बाविस्कर हिला घेऊन जाऊन नवीन लग्नाचा बहाना करून विशाखा छापानी, शैलेश राऊत व एजंट गंगाधर ढेरे यांना अटक केली.अटक करताना त्यांनी बरेच आडेवेडे घेतले मात्र पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्याच. या प्रकरणाचा तपास अंमलदार चंद्रकांत आदलिंगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमेदवारी नको पण हकालपट्टी टाळा, मुंबईला तिकिट मागायला गेलेल्या ४ भाजप पदाधिकाऱ्यांची फजिती; बारमध्ये काय घडलं?

आम्ही नक्की काय समजायचं? भूषण प्रधानने शेअर केले अभिनेत्रीसोबतचे फोटो; पण प्रेक्षकांना वेगळीच शंका, चर्चांना उधाण

Viral Video: "मी मुस्लिम, पण मला भगवा रंग आवडतो"; आयफोन 17 च्या 'कॉस्मिक ऑरेंज' रंगाची क्रेझ!

Sharad Pawar : पडळकरांचं हे वागणं योग्य नाही! शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना केला फोन, नेमकं काय म्हणाले?

Yasin Malik : दहशतवादी यासिन मलिकचा मोठा दावा! म्हणाला, 'हाफिज सईदला भेटल्यानंतर मनमोहन सिंग यांनी...'; वाजपेयी, सोनिया गांधींचंही घेतलं नाव

SCROLL FOR NEXT