Jain Paipe
Jain Paipe 
सोलापूर

मोहोळ पोलिसांनी पकडला नकली एचडीपीई पाइपचा ट्रक ! कंपनीसह दोघांवर गुन्हा 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : सुमारे पंचान्नव हजार रुपये किमतीच्या बनावट एचडीपीई पाइपवर जैन कंपनीचे शिक्के मारून कंपनीची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील एका कंपनीसह तीन जणांवर मोहोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. 19) रात्री सय्यद वरवडे शिवारातील एका ढाब्यावर घडली असून, यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या व जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक प्रकाश दगडू गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून जैन कंपनीचा एचडीपीई बनावट पाइप विकला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, टेराफ्लो पाइप (रिबदा, ता. गोंधाल, जि. राजकोट, गुजरात) या कंपनीकडून बंधू इलेक्‍ट्रिकल, चडचण (ता. इंडी, जि. विजयपूर) येथे जैन कंपनीचे एचडीपीई जैन ट्रेडमार्क पाइप कॉपीराईट करून कंपनीचे नाव वापरून विकण्यासाठी जीजे 03/बीपी 9840 या मालट्रकमधून जात असल्याचे आम्हाला समजले. त्यानुसार आम्ही गाडीचा शोध घेत असता, हा मालट्रक मोहोळ तालुक्‍यातील सय्यद वरवडे येथील एका ढाब्यावर उभा असल्याचा दिसला. 

ट्रकच्या चालकाला नाव विचारले असता त्याने जीवनभाई जिलाभाई झापडा असल्याचे सांगत, टेराफ्लो कंपनी येथून पाइप भरल्याचे सांगितले. त्याच्याकडील पावत्या पाहिल्या असता त्या बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून हे पाइप आमच्या कंपनीचे नसल्याची खात्री झाल्याने व गुजरातमध्ये आमच्या कंपनीचे नकली स्वामित्व चिन्ह वापरून कंपनीची फसवणूक केल्याचे लक्षात आले. 

टेराफ्लो कंपनी, जीवनभाई झापडा व हिमताराम अंबादास चौधरी (रा. चडचण) अशा तिघा जणांविरोधात व्यवस्थापक प्रकाश गोरे यांनी फिर्याद दिली असून, त्यांच्या विरोधात मोहोळ पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल देवडे करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT