सोलापूर

काम कसे करु... राजीनामाच घ्या...

सकाळवृत्तसेवा

मोहोळ (जि. सोलापूर) ः मोहोळ ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका नाही. चालकाचे पद गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची भर पडत आहे. तालुक्‍यासह बाहेरील राज्यातील रुग्ण याठिकाणी येतात. रात्री अपरात्री रुग्ण आले तर त्यांना विलगीकरण कक्षात पाठवायची व्यवस्था कशी करणार? रुग्णाना सोयी सुविधा मिळत नसतील तर काम कसे करायचे या नैराश्‍यातून मी राजीनामा दिला असल्याची माहिती मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक डॉ. पी. पी. गायकवाड यांनी दिली. 

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी तुम्हाला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देतो, असे आश्वासन दिल्याची माहितीही डॉ. गायकवाड यांनी दिली. 

मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक हे पद गेल्या अनेक दिवसापासून रिक्त आहे. सध्या प्रभारी म्हणून डॉ. गायकवाड काम पाहत आहेत. सध्या कोरोनासारख्या आजाराचे उच्चाटनासाठी काम करीत असताना प्रशासनाचे कुठलेही सहकार्य मिळत नाही. वेळोवेळी मागणी करूनही पूर्तता होत नाही. त्यापेक्षा राजीनामा देणेच योग्य या भावनेतून मी राजीनामा दिला असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. राजीनामा देताच एकच खळबळ उडाली आहे. नजीक पिंपरी (ता. मोहोळ) येथील विलगीकरण कक्षात ठेवलेले रुग्ण निघून जाण्याच्या मानसिकतेत आहेत. त्याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेमावेत, अशीही मागणी गायकवाड यांनी वरिष्ठाकडे केली होती. महाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालयात अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी करूनही ती शासनाकडुन भरली जात नाहीत, संशयित म्हणून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आजपर्यंत सोळाशे नागरिकांची तपासणी केल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. 

राजीनामा दिला रुग्णसेवा सुरूच 
मी कामासाठीच आहे. काम करायचे म्हणून तरी प्रशासनात आलो आहे, पण रुग्णासाठी जर सोयी सुवीधा मिळत नसतील तर काम कसे करणार? राजीनामा दिला असला तरी रुग्णसेवा सुरू आहे. 
डॉ. पी. पी. गायकवाड, प्रभारी वैद्यकीय अधिक्षक मोहोळ . 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT