In Mohol woman has threatened a man with a knife 
सोलापूर

मोहोळमध्ये महिलांनी चाकूचा धाक दाखवून लुटले; तिघींना अटक

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) : फोन करून बोलावून घेऊन पडसाळी (ता. माढा) येथील एकाला मोहोळ येथील हॉटेलमध्ये चाकूचा धाक दाखवून तीन महिलांनी मारहाण व दमदाटी करीत खिशातील रोख आठ हजार रुपये व एटीएम कार्ड काढून घेतले. याबाबत पोलिसात तक्रार केली तर छेडछाडीचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करु व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी (ता. 30) सकाळी दहाच्या सुमारास मोहोळ येथे घडली. दरम्यान, तिघींनाही मोहोळ पोलिसांनी अटक केली आहे. 

पडसाळी (ता. माढा) येथील अनिल नागनाथ देशमुख यांना आठ दिवसांपूर्वी एका मोबाईल नंबरवरून मिसकॉल आला. त्यांनी फोन करून चौकशी केली असता, तो वनिता पवार या महिलेचा असल्याचे समजले. त्यांचा व अनिल देशमुख यांचा परिचय नसल्याने देशमुख त्यावेळी जास्त काही बोलले नाहीत. त्यानंतर पुन्हा त्याच नंबरवरून वनिता पवार फोन करून सारखेच बोलू लागली. तिने मोहोळ येथे आपण भेटूया, असे म्हणून फोन करून बोलावून घेतले.

त्यानुसार मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास अनिल देशमुख पडसाळी गावातून एकटेच दुचाकीवर अनिता पवार यांना भेटण्यासाठी मोहोळ येथे आले. एका हॉटेलमध्ये वनिता पिंटू पवार व तिच्यासोबत प्रीती लखन चव्हाण (रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) व माही नितीन काळे (रा. मानेगाव, ता. माढा) अशा तिघी होत्या. तिघींनीही अनिल देशमुख हॉटेलमध्ये गेल्यावर आपण चहा पिऊ, असे म्हणून आतमध्ये घेऊन गेल्या.

त्या वेळी तिघांनीही पायातील चपला काढून अनिल देशमुख यांच्या तोंडावर मारण्यास सुरुवात केली. शिवीगाळी, दमदाटी करत चाकूचा धाक दाखवून खिशातील आठ हजार रुपये, एटीएम कार्ड असे बळजबरीने काढून घेतले. तू जर पोलिसात तक्रार केली तर आम्ही तुझ्या विरोधात छेडछाड व बलात्काराचा गुन्हा दाखल करतो, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत देशमुख यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी वरील तिघीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हवालदार मालती नागरे-देशमुख तपास करीत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT