Solapur Crime esakal
सोलापूर

Solapur Crime : दोन चिमुरड्यांचा गळा घोटून आईची आत्महत्या; तोंडावर उशी दाबून खून केल्याचा संशय

मयत महिला ही स्वभावानं तापट असल्यानं हा प्रकार झाला असावा, असं स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

टीव्हीचा आवाज वाढवलेला असल्याने मुलांचा आवाज कुणालाही ऐकू गेला नसावा. रात्री उशिरा सुहास हे कामावरून घरी परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

सोलापूर : शहरातील राजस्व नगरातील एक महिला व दोन बालकांचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 4) घडली. याप्रकरणी मध्यरात्री उशिरापर्यंत सिव्हिल पोलिस (Civil Police) चौकीत नोंद करण्याचं काम सुरु होतं. या घटनेत महिलेनं रागाच्या भरात मुलांना मारून स्वतः आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राजस्व नगरातील महिला ज्योती सुहास चव्हाण (वय 27) व तिची मुलं अथर्व (वय साडेतीन वर्षे) व आर्या (वय दोन वर्षे) ही बेशुद्ध अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिस घटनास्थळी पोहचल्यानंतर तत्काळ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (Chhatrapati Shivaji Maharaj Hospital) आणण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी महिला व तिच्या दोन्ही मुलांची तपासणी करण्याचे पत्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलं.

गळ्यातील दागिने दुरुस्तीवरून वाद

दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजस्व नगरात राहणारे सुहास चव्हाण व त्यांची पत्नी ज्योती यांच्यात गळ्यातील दागिने कधी दुरुस्त करून आणता यावरून त्यांच्यात वाद झाला होता.

त्यानंतर सुहास हे नेहमीप्रमाणं कामावर निघून गेले. त्यानंतर मयत महिलेनं तिची मुलं आर्या व अथर्व यांना उशिनं तोंड दाबून मारलं. त्यानंतर घरात आतून कुलूप लावून स्वतः घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

मयत महिला स्वभावानं तापट

टीव्हीचा आवाज वाढवलेला असल्याने मुलांचा आवाज कुणालाही ऐकू गेला नसावा. रात्री उशिरा सुहास हे कामावरून घरी परत आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तत्काळ मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी पाठवला.

रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. पण, मयत महिला ही स्वभावानं तापट असल्यानं हा प्रकार झाला असावा, असं स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं. या प्रकारानं राजस्व नगरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : शिर्डीत हनुमान जयंतीला ताकदीचा जल्लोष! 125 किलो गोटा उचलण्याच्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT