सोलापूरः सात्विक स्वभावातून आलेले मंगलमय सुराच्या गाण्यासोबत आई या नात्याने तीने आम्हाला भरभरून फुलण्याचे स्वप्न दिले अन त्यासोबत कलेशी जीवन बांधण्याचे शिकवले असा सुर माणिक कन्या कार्यक्रमातून सुप्रसिध्द गायिका माणिक वर्मा यांच्या कन्या अभिनेत्री भारती आचरेकर, वंदना गुप्ते, गायीका राणी वर्मा व अरुणा जयप्रकाश यांनी मांडला. कला व संसाराचे नाते सुमधूर ठेवण्याचा एक आदर्श माणीक ताईंनी आमच्या आयुष्यात संस्काररुपाने ठेवण्याच्या प्रसंगाच्या आठवणींनी प्रिसिजन दिवाळी गप्पाचा दुसरा दिवस अधिक रंगतदार झाला.
लहानपणापासून आम्हाला आईने वाढवत असताना आमच्यातील कलागुणांना वाव मिळेल या पध्दतीने पाहिले. सुरेल गायकीला असलेला सात्विकतेचा स्पर्श त्यांच्या व्यक्तीमत्व व सुराला देखील होता. त्या काळात आईची गाणी पाहण्याच्या कार्यक्रमात मुलीने म्हटले तर ती मुलगी सुशील मानली जात असे.
अनेक तासाच्या मैफली करत असताना ती अटीतटीने मिळेल ते वाहन करून आम्हा मुलाकंडे धाव घेत असे. पहाटे रियाज, घरची कामे हा संसाराचा तोल सांभाळताना तिने संवादी स्वरातून आम्हाला घडवले. कितीतरी प्रसंगातून तिने अगदी सहजपणे हा तोल साधला. दोन तीन खोल्यामध्ये वीस ते पंचवीस पाहूणे दिवाळी व उन्हाळी सुटीमध्ये राहत असत. या सर्वाचे करताना आई कधीही थकली नाही किंवा तीच्या चेहऱ्यावर कधी आठी दिसली नाही. आई व बाबांचा या गुणांतून आम्ही माणसाच्या श्रीमंतीमध्ये घडलो. अनेकांसोबत कसे एकत्र राहावे याचा तो संस्कार होता.
नंतर आम्ही कलाक्षेत्रात गेलो तेव्हा तीने कधीही आम्हावर गायकीचे शिक्षण लादले नाही. उलट कौतुकासाठी ती आमच्या नाटकांना हजर राहत असे.
अनेक पं.भिमसेन जोशी, बाबूजी सारखी अनेक दिग्गज गायक सहज घरात येऊन माणिकताई साधा वरणभात देखील प्रेमळ आग्रहाने मागत असत. कला शिकावी तर ती मन लावून शिकावी हे आईने तर वडिलांनी संसार हा सुखी राहण्याच्या अटीवर स्विकारावा हे शिकवले. या चारही कलावंतांनी सांगितलेल्या या आठवणीची मैफल अगदी रंगतदार ठरली तर रसिकांचा मोठा प्रतिसाद त्याला लाभला. प्रास्ताविक डॉ. सुहासिनी शहा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.