mp jai siddheshwar mahaswami will try funding for mohol hospital solpaur  Sakal
सोलापूर

Solapur News : मोहोळ येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या निधीसाठी प्रयत्न करू - खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी

खासदार महास्वामी यांनी आज मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देऊन कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधला

सकाळ वृत्तसेवा

मोहोळ : मोहोळच्या ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणी वर्धन होऊन उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केल्याबद्दल खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानत, पुढील काळात रुग्णालयात रूग्णांना चांगल्या सुविधा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

खासदार महास्वामी यांनी आज मोहोळ येथील ग्रामिण रुग्णालयाला भेट देऊन कार्यकर्ते आणि रुग्णालयातील कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्याकडे भाजपच्या पदाधिकारी व नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करून या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनास मान्यता मिळवून घेतली असल्याचे सांगितले.

मोहोळ येथील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार असून, मोहोळ रेल्वे स्थानकावर सिद्धेश्वर, चेन्नई-दादर एक्सप्रेस या गाड्यांना लवकरच थांबा मिळणार आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे. उपजिल्हा रुग्णालयाला लवकरात लवकर निधी मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे खा महास्वामी यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, संजय क्षीरसागर, जिल्हाउपाध्यक्ष सतीश काळे,शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, फंटू गोफणे, मधुकर पाटील,प्रज्ञावंत आघाडीचे जिल्हा सहसंयोजक अविनाश पांढरे, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, सतीश पाटील, मुजीब मुजावर, उपाध्यक्ष विनोद देशपांडे, सुशील मोटे ,गुरुराज तागडे ,धनंजय मोहोळकर, तानाजी बनसोडे ,पांडुरंग लेंगरे ,द्रोणा लेंगरे ,आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

नूतन तहसीलदारांना सूचना

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते मोहोळचे नूतन तहसीलदार सचिन मुळीक यांचा सत्कार करण्यात आला. पुर्वीच्या तहसीलदारांचा अनुभव लक्षात घेता खासदार स्वामी यांनी सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच भाजपाचे कार्यकर्ते यांची रितसर व कायदेशीर कामे असतील त्याकडे नीट लक्ष देऊन ती करण्याच्या सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Bans China Cars : इस्त्रायलमध्ये 'मेड इन चायना' वाहनांवर बंदी, ७०० कार जप्त; सरकारचा 'या' कारणामुळे मोठा निर्णय

अग्रलेख : चला उभारा शुभ्र शिडे ती..

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

फास्ट फूड ते फॅटी लिव्हर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 नोव्हेंबर 2025

SCROLL FOR NEXT