mohol DP.jpg
mohol DP.jpg 
सोलापूर

पुरामुळे मोहोळ तालुक्‍यात महावितरणचे तीन कोटी रुपयांचे नुकसान 

राजकुमार शहा

मोहोळ (सोलापूर) ः मोहोळ तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे विद्युत महावितरणचे नजर अंदाजानुसार ट्रान्सफॉर्मर, वीजवाहक तारा, केबल, विद्युत खांब आदींसह अन्य साहित्याचे सुमारे तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित झालेल्या सर्व 47 गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरू केल्याची माहिती महावितरणचे मोहोळ येथील सहाय्यक अभियंता हेमंत ताकपेरे यांनी दिली. 

ता. 14 व 15 ऑक्‍टोबर रोजी मोहोळ तालुक्‍यात अतिवृष्टी झाली, तसेच नद्यांना आलेल्या पूरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पुराच्या पाण्यामुळे महावितरणच्या उच्च दाब व लघु दाब वीज वाहक तारा, ट्रान्सफॉर्मर यासह अन्य साहित्याचे मोठे नुकसान झाले. वीजवाहक तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला .अनेक ट्रान्सफॉर्मर मध्ये पाणी गेले, विद्युत खांब पडले. हे सर्व सुस्थितीत आणून बाधित गावातील वीज पुरवठा सुरळीत करणे म्हणजे महावितरण समोर मोठे आव्हान होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे उच्चदाब विज वाहिनीचे 182, तर लघुदाब वीज वाहिनीचे 530 खांब पडले, 89 ट्रांसफार्मर खराब झाले, उच्चदाब वाहिनीच्या पंधरा किलोमीटर तर लघुदाब वीज वाहिनीच्या सत्तर किलोमीटरच्या वीजवाहक तारांचे नुकसान झाले. कचरा अडकल्यामुळे 32 एबी स्वीच खराब झाले, सात किलोमीटर विद्युत वाहक केबल खराब झाली. खराब झालेल्या 89 ट्रान्सफॉर्मर मधील ऑईल खराब झाले. तर 110 डीपी बॉक्‍स खराब झाले. महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, कार्यकारी अभियंता अमोगसिद्ध हुवाळे, सर्व शाखा अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली अगोदरच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लाईनमन, वायरमन व गॅंग असे मिळून 175 कर्मचारी परिश्रम घेत आहेत. गाळामुळे अनेक ठिकाणी अद्यापही जाता येत नाही, त्या ठिकाणी कर्मचारी आपले कौशल्य पणाला लावून त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा कसा सुरळीत करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

असे झाले आहे नुकसान 
उच्चदाब व लघुदाब विज वाहीनीचे पडलेले खांब - 712 
खराब झालेले ट्रान्सफॉर्मर - 89 
उच्च व लघुदाब वाहिनीच्या खराब झालेल्या तारा - 85 कि मी 
खराब झालेले एबी स्वीच -32 
खराब झालेली केबल - 7 कि मी 
खराब झालेले डीपी बॉक्‍स -110 
ट्रान्सफॉर्मरना लागणारे ऑईल - 2 हजार लिटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT