bribe esakal
सोलापूर

महावितरणचा अधिकारी लाच घ्यायला कोल्हापुरातून सोलापुरात आला, अन्‌...

सहाय्यक विद्युत निरीक्षक (वर्ग-२) या पदावर कार्यरत फैजूलअली मेहबूब मुल्ला (वय ५३) याला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, मुल्लाने ती लाचेची रक्कम त्याच्या स्वत:च्याच कार्यालयात स्वीकारली. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले.

तात्या लांडगे

सोलापूर : सहाय्यक विद्युत निरीक्षक (वर्ग-२) या पदावर कार्यरत फैजूलअली मेहबूब मुल्ला (वय ५३) याला १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे, मुल्लाने ती लाचेची रक्कम त्याच्या स्वत:च्याच कार्यालयात स्वीकारली. त्याचवेळी त्याला पकडण्यात आले.

महावितरणच्या माध्यमातून विजेच्या दुरुस्तीसह अन्य कामांसाठी खासगी तत्त्वावर कंत्राटदार नेमले जातात. पण, त्यासाठी महावितरणकडून दोन परवाने घेणे आवश्यक आहे. प्रारंभी विद्युत पर्यवेक्षक म्हणून परवाना मिळाल्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्तीला महावितरणचा अधिकृत ठेकेदार म्हणून परवाना दिला जातो. ते दोन्ही परवाने देण्यासाठी कोल्हापूर व सोलापूर येथील दोन्ही कार्यालयांचा पदभार मुल्ला याच्याकडे आहे. तक्रारदाराला त्याने यापूर्वीच पहिला परवाना दिला होता. पण, त्यावेळी तक्रारदाराने त्याला काहीच रक्कम दिलेली नव्हती. त्यामुळे मुल्लाने तक्रारदाराला पूर्वीच्या कामाचे बक्षीस म्हणून दहा हजार रुपये तर नवीन परवान्याचे २२ हजार अशी एकूण ३२ हजार रुपयांची लाच मागितली. त्या लाचेतील पहिलाच हप्ता घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अंमलदार शिरीषकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, स्वप्निल सण्णके, प्रफुल्ल जानराव यांनी केली. त्याला आता उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. तत्पूर्वी, त्यांच्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचेसाठी खास कोल्हापूरहून आला सोलापुरात
सहाय्यक विद्युत निरीक्षक या पदावर अनेक वर्षे काम केलेल्या मुल्लाची मालमत्ताही पडताळली जाणार आहे. तत्पूर्वी, त्याच्याकडे कोल्हापूर व सांगली या दोन जिल्ह्यांचा पदभार असल्याने तो काही दिवस कोल्हापूरला तर काही दिवस सोलापूर येथे ड्यूटी करायचा. तीन दिवसांच्या सुट्टीमुळे तो कोल्हापूर कार्यालयातच होता. पण, तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेण्यासाठी तो खास कोल्हापूर येथून दुपारी सोलापुरात आला होता, अशी माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : कंत्राटदाराने जीवन संपवल्याने सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT