Praniti Shinde 
सोलापूर

प्रणिती शिंदेंच्या "या' मागणीवर महापालिका आयुक्त म्हणाले...

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेतील 563 कर्मचाऱ्यांना लिपिक पदावर पदोन्नती मिळूनही त्यांना संगणक हाताळता न येणे, टायपिंग करता येत नाही, ही गंभीर बाब आहे. त्यांना ठरल्याप्रमाणे परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागेल, असे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. अनुत्तीर्ण लिपिकांना सरावासाठी तीन ते सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली होती. मात्र, त्यावर प्रशासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी या वेळी सांगितले. 

पदोन्नतीने लिपिक झालेल्यांना त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडता येत नसल्याने आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी फेरपरीक्षा बंधनकारक केली आहे. ही परीक्षा व अनुत्तीर्ण लिपिकांवरील कारवाई थांबवावी, अशा मागण्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे करण्यात आल्या. मात्र, आयुक्‍त परीक्षा घेणे आणि अनुत्तीर्ण लिपिकांवरील कारवाईवर ठाम आहेत. रविवारी (ता. 16) आमदार शिंदे आणि आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आयुक्‍तांनी तीन ते सहा महिन्यांची मुदत देण्याचे मान्य केल्याचा अनेकांनी आनंद व्यक्‍त केला. कर्मचारी संघटनेच्या काही नेत्यांनी हस्तलिखित प्रेसनोटही सोशल मीडियातून व्हायरल केली. मात्र, आपण तसा काहीच निर्णय घेतला नसून संबंधितांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आणखी एकच संधी दिली जाईल. त्याची मुदत प्रशासकीय पातळीवर ठरविली जाईल. त्यानंतरही अनुत्तीर्ण झालेल्यांना कायद्यानुसार मूळ पदावर वर्ग केले जाईल, असेही आयुक्‍तांनी या वेळी ठामपणे सांगितले. 

नऊ लिपिकांनी मारली दांडी 
महापालिकेच्या विविध विभागांमधील 530 लिपिकांची सोमवारी (ता. 17) टंकलेखनाची परीक्षा पार पडली. सात सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक सत्रात 75 कर्मचाऱ्यांनी परीक्षा दिली. दोन सत्रात 20 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले होते. या परीक्षेसाठी नऊ लिपिक गैरहजर राहिले. आता या लिपिकांना संगणकाची परीक्षा द्यावी लागणार आहे. निरोप देऊनही गैरहजर राहिलेल्या लिपिकांबाबत लवकरच ठोस निर्णय घेऊ, असेही आयुक्‍तांनी स्पष्ट केले. परीक्षेचा निकाल हाती आल्यानंतर आणखी किती दिवस मुदत द्यायची, याबाबत निर्णय होईल, असेही आयुक्‍त शिवशंकर म्हणाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cold Wave : हुडहुडी भरवणारी थंडी! महाराष्ट्रात पारा घसरला, विदर्भातील तापमान १० अंशाच्याही खाली...

New Year Holidays : २०२६ मध्ये सुट्ट्यांची लॉटरी! महाराष्ट्रात ७४ सार्वजनिक व ९८ शासकीय सुट्ट्या; मार्च-ऑगस्ट ठरणार ‘हॉलिडे हॉटस्पॉट’

Latest Marathi News Live Update : मनसेचा आज मुंबईत पहिला मेळावा, राज ठाकरे करणार संबोधित

भुस्सा भरलेला ट्रक उलटल्यानं बोलेरोचा चुराडा, चालकाच्या डोक्याचा चेंदामेंदा; अपघाताचा VIDEO आला समोर

Nagpur Municipal Election : अपक्षांसाठी सफरचंद, बिस्कीट, पाव, केक; महानगरपालिका निवडणुकीसाठी आयोगाकडून १९४ चिन्हे निश्चित

SCROLL FOR NEXT