सोलापूर

मराठा आरक्षणप्रश्नी शरद पवार उदासीन का? नरेंद्र पाटील यांचा सवाल

भारत नागणे

नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पंढरपूर येथे विठुरायाचे आणि संत नामदेवांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

पंढरपूर (सोलापूर) : शरद पवार (Sharad Pawar) हे हॉटेल व पान वाल्यांचे प्रश्न सोडवू शकतात. त्यांना कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. मनात आणलं तर ते काहीही करु शकतात, असं त्यांच्या बाबतीत आजही म्हटले जाते. पण स्वतः मराठा असतानाही ते मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर इतके असंवेदनशील आणि उदासीन का? असा सवाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांनी सोमवारी पंढरपुरात केला. तसेच राष्ट्रवादीने मराठा समाजाच्या आंदोलनातून काढता पाय घेतल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. (Narendra Patil has asked why Sharad Pawar is indifferent to the Maratha reservation issue)

नरेंद्र पाटील यांनी सोमवारी पंढरपूर येथे विठुरायाचे आणि संत नामदेवांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

श्री. पाटील म्हणाले की, मराठा समाज आरक्षण मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनातून सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि आमदारांनी सोयीस्करपणे काढता पाय घेतला आहे. ते सावलीच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहेत. हे मराठा समाजाचं दुर्भाग्य आहे. 2017 मध्ये आरक्षणासाठी समाज बांधवांनी 58 मोर्चे काढले. त्या मोर्चामध्ये सत्ताधारी आणि विरोधातील सर्व मराठा समाजातील मंत्री आणि आमदार एकजुटीने सहभागी झाले होते. आता मात्र सत्ताधारी पक्षातील मराठा आमदार आणि मंत्री आंदोलनात सहभागी होत नाहीत. तरीही जे येतील त्यांना सोबत घेवून आम्ही हे आंदोलनाची लढाई सुरुच ठेवणार आहे.

शरद पवार हे भारताचे चाणक्‍य म्हणून ओळखले जातात. कोणताही प्रश्न ते सहज सोडवू शकतात. पण त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात का लक्ष घातले नाही, याचे कोडे अजून उलघडले नाही. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्यावेळी मराठ्याचा पक्ष म्हणून पक्षाची ओळख होती. आज ही सत्तेतील राष्ट्रवादीमध्ये बहुतांश मराठा मंत्री आहेत. परंतु, मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल राष्ट्रवादीचे आणि त्यांच्या नेत्यांमध्ये इतकी उदासीनता का आहे, याविषयी आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, मराठा महासंघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, किरण घाडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, डॉ. बी. पी. रोंगे, प्रशांत देशमुख, श्री. लटके आदींसह मराठा समाज बांधव उपस्थित होते.

दरम्यान, येत्या 4 जुलै रोजी मराठा आरक्षण मागणीसाठी सोलापुरात राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चाची तयारी करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात बैठकांचे आयोजन केले आहे. मोर्चा संदर्भातील पहिली बैठक सोमवारी पंढरपुरात झाली. बैठकीमध्ये मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

मराठा मंत्र्यांनी ओबीसीचा बोध घ्यावा

दोन दिवसापूर्वी ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी नेत्यांचे लोणावळ्यात चिंतन शिबिर झाले. या शिबिरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व ओबीसी नेते सहभागी झाले होते. मात्र, मराठा समाजातील मंत्री आणि आमदार एकत्र येऊ शकत नाहीत. मराठा समाजातील मंत्री आणि आमदारांनी ओबीसी मंत्री आणि आमदारांना बोध घ्यावा, असा सल्लाही नरेंद्र पाटील यांनी दिला. (Narendra Patil has asked why Sharad Pawar is indifferent to the Maratha reservation issue)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kangana Ranaut: कंगनाच्या कानशिलात लगावणारी CISF जवान इतकी का संतापली? कुलविंदरच्या नातेवाईकानं सांगितलं

इम्रान खान यांनी दिलं अरविंद केजरीवालांचे उदाहरण; म्हणले, भारतातील सर्वोच्च न्यायालयाने....

Narendra Modi: कुठं होणार नरेंद्र मोदींचा पंतप्रधानपदाचा शपथविधी? नवी माहिती आली समोर

NEET च्या निकालावर देशात खळबळ! न्यायालयाची एनटीएला नोटीस, काय आहे प्रकरण?

Chandrababu Naidu: एक्झिट पोलचा अंदाज अन् चंद्राबाबू मालामाल, शेअर बाजारातून कमावले 870 कोटी, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT