Corona Esakal
सोलापूर

कोरोनाच्या मृत्यूपासून एक लाख सहा हजार व्यक्‍ती सुरक्षित

तात्या लांडगे

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार व्यक्‍तींसह राज्यातील 49 लाख लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूपासून सुरक्षित राहिले आहेत.

सोलापूर : कोरोनावरील (Corona) प्रतिबंधित लसीचा एक डोस घेतलेल्या काहीजणांचा मृत्यू (Died) झाला. परंतु, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अनेकांना कोरोना होऊनही दुसऱ्या लाटेत त्यातील एकाचाही मृत्यू झालेला नाही. दोन्ही डोस घेतलेले सोलापूर जिल्ह्यातील एक लाख सहा हजार व्यक्‍तींसह राज्यातील 49 लाख लोक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूपासून सुरक्षित राहिले आहेत. (none of the corona patients who take both doses in solapur district died)

सोलापूर शहरात 18 ते 44 वयोगटातील तीन लाख 66 हजार 276 तर ग्रामीण भागात 13 लाख 13 हजार 401 व्यक्‍ती आहेत. तर 45 वर्षांवरील 13 लाख 99 हजार 729 व्यक्तींचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यात शहरातील तीन लाख पाच हजार 229 व्यक्‍तींचा समावेश आहे. 18 वर्षांवरील एकूण 30 लाख 70 हजार 406 व्यक्‍तींचे लसीकरण होणे अपेक्षित आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर आता 21 जूनपासून 18 वर्षांवरील व्यक्‍तींना मोफत लस टोचली जाणार आहे.

तत्पूर्वी, कोरोनाची लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्‍तीच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्‍ती तयार होते आणि दुसऱ्या डोसनंतर त्याची क्षमता कायम शरीरात राहते. त्यामुळे दोन्ही डोस टोचलेल्या व्यक्‍ती कोरोनाला बळी पडत नाहीत. एक अथवा दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा होतेच, परंतु त्या व्यक्‍तीला विषाणूमुळे तीव्र तथा अतितीव्र लक्षणे जाणवत नाहीत. अशा व्यक्‍तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याचा मृत्यू होत नाही. त्याच्यावर ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरशिवाय उपचार शक्‍य होतात. त्यामुळे आता लसीकरणासाठी केंद्रांवर गर्दी वाढू लागली असून सोलापूर शहर-जिल्ह्यात लांबलचक रांगा दिसू लागल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना होतो, परंतु त्या रुग्णाला व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजनची गरज लागत नाही. तो अधिक क्रिटिकल न होता उपचारातून सहज बरा होतो.

- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

तालुकानिहाय डोस घेतलेल्या व्यक्‍ती

तालुका पहिला डोस दुसरा डोस

उत्तर सोलापूर 12,525 2,116

दक्षिण सोलापूर 30,123 5,712

मोहोळ 23,202 4,758

मंगळवेढा 20,390 3,200

सांगोला 25,711 5,040

माढा 34,888 6,104

अक्कलकोट 28,315 6,536

करमाळा 22,219 3,449

माळशिरस 47,734 10,102

बार्शी 44,545 11,276

पंढरपूर 37,966 8,860

एकूण 3,27,618 67,153

शहरात सहा टक्‍के व्यक्‍तींनाच दुसरा डोस

शहरातील 18 वर्षांवरील सहा लाख 71 हजार 505 व्यक्‍तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एक लाख 92 हजार 320 जणांनी कोविशिल्ड तर पाच हजार 800 व्यक्‍तींनी कोवॅक्‍सिन लस टोचून घेतली आहे. पहिला डोस टोचून घेतलेल्या शहरातील एक लाख 98 हजार 120 जणांपैकी 39 हजार 583 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. सद्यस्थितीत कोरोनापासून या व्यक्‍ती सुरक्षित आहेत. कोविशिल्ड लस घेतलेल्यांना 84 दिवसांनंतर तर कोवॅक्‍सिजन ही लस घेतलेल्यांना 30 दिवसानंतर दुसरा डोस दिला जात आहे.

(none of the corona patients who take both doses in solapur district died)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT