vivah sohala.jpg 
सोलापूर

छोटेखानी विवाह सोहळ्यांबाबत आता कायद्याची अपेक्षा ! कोरोनाने शिकवला धडा

चंद्रकांत देवकते

मोहोळ (सोलापूर): कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर माणसांच्या संपूर्ण जीवन शैलीवरच परिणाम झालेला दिसून येत आहे. या निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये बदल करणे माणसांच्या हातात नसले तरी या परिस्थितीत काही सकारात्मक बदल स्वीकारून आपले सामाजिक व वैयक्तिक जीवन कसे आनंदी करता येईल, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. अशा अनेक बदलापैकी विवाहपद्धतीमध्ये बदल करणे ही एक राष्ट्रहिताच्या दृष्टीने काळाची गरज बनली आहे. जास्तीत जास्त छोटेखानी विवाह सोहळ्या होण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी, प्रतिक्रीया सार्वजनिक क्षेत्रातून उमटत आहे. 

संस्कृतीमध्ये सोळा संस्कारापैकी विवाह हा एक संस्कार आहे. बदलत्या जीवन शैलीमध्ये हा संस्कार न राहता तो सोहळा बनून घराण्याची प्रतिष्ठा, डामडौल, लोकप्रियता दाखविण्याचे एक माध्यम बनले आहे. परिणामी यामुळे वधू व वर दोन्ही पक्षाकडील व्यक्तींना विविध प्रकारच्या अडचणीला सामोरे जावे लागते. मग ज्यांच्या त्याच्या एैपतीप्रमाणे निर्माण झालेली अडचण, समस्या छोट्यामोठ्या असू शकतात. विवाह हा सोहळा नसून एक संस्कार आहे, याचा विसर कालानुरूप समाजाला पडला आहे. विवाह कितीही मोठा केला, लक्ष लक्ष भोजन घातले तरी कालांतराने लोक विसरून जातात. 

मात्र, अशा विवाहांवर आता कोरोनाच्या संकटाने बंधन आले आहे. लॉकडाउनमध्ये सर्वाजनिक कार्यक्रमांसह विवाह सोहळ्यांनाही बंदी घाल्यात आली होती. असे असले तरी लॉकडाउनमध्ये मोठ्या आनंदी वातावरणात घरगुती विवाह सोहळे पार पडल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. सर्वसामान्यांपासून आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या अनेकांनी लॉकडाउनमध्ये घरगुती विवाह केले. अशा विवाह सोहळ्यांचे फायदा आता अनेकांना पटू लागले असल्याने यासाठी शासनानेच कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करण्याची मागणी वाढू लागली आहे. 

छोटेखानी विवाहासाठी कायदयाची गरजच का? 

शेतीतील उत्पन्नामध्ये होत असलेली घट, शेती मालाचे अस्थिर भाव, अन्नाची होणारी नासाडी तसेच वरात, परण्या व त्यामुळे बेधुंत होत असलेल्या युवकांमध्ये व्यसनाधिनतेचा चंचुप्रवेश होत आहे. त्यामुळे याला पायबंद घालण्याची आवश्‍यकता आहे. तसेच कोरोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने लग्नविधी, अंत्यसंस्कार यावर मर्यादा घालत सर्वच धर्मियांचे सार्वजनिक समारंभ, यात्रा, जत्रा यावर बंदी घातली. परिणामी त्याचे चांगले परिणाम सर्वांनीच पाहिले. या काळात लग्न पार पडलेल्या कुटुंबाची आजची मानसिकता जर पाहिली तर "बरं झालं बाबा, डोक्‍याचा ताप मिटला. कोरोनामुळे लाख दोन लाखाला घर वाचलं, यापेक्षा पै पाहुण्याची बडदास्त ठेवणं, अनेकांची मनधरणी करणं यासह अनेक प्रकारच्या मानसिक त्रासापासून वाचलो रे बाबा, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. आजची बचत ही उदयाची निर्मिती आहे. अशा अनेक कारणामुळे छोटे विवाह ही काळाची गरज असून समाज व राष्ट्रहिताचा विचार करून यासाठी कायदा झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी प्रबोधनात्मक संघटनानी एकत्र येत प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

ही काळाची गरज 
छोटेखानी विवाह ही काळाची गरज असून यामुळे मानपान हा कौटुंबिक वादाचा कळीचा मुद्दाच नष्ट होईल. लग्नकार्यामध्ये होणारा लाखो रूपयाचा खर्च (बुडीत खर्च) तुम्ही वधू-वरांच्या प्रपंचासाठी, पुढील शिक्षणासाठी, उद्योग व्यवसायासाठी वापरू शकता. सध्या खोट्या सामाजिक प्रतिष्टेला घाबरून लोक अशा विवाहाला तयार होत नाहीत. पण जर कायदाच केला तर नक्कीच जनतेतून याच कौतुक होईल. 
- संतोष गायकवाड, जिल्हा समन्वय, सकल मराठा समाज 

कायदा होणे महत्वाचे 
छोटेखानी विवाह सोहळ्यांमुळे सर्वसामान्यांची परवड थांबेल. वेळेची व पैशाचीही बचत होईल. लोकांनी स्वतःहून अशा विवाहांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पंरतु यासाठी कायदा करणे योग्य नाही. कारण तोरणादारी आणी मरणादारी सर्व काही विसरलं जातं. त्यामुळे यासाठी कायदा केला तर लोकांच्या नातेसंबधाला प्रेमाला आपण बंधन आणू शकत नाही. नाहीतर अंतकरणातील प्रेम, नातेसंबध लोप पावतील. 
- संजीव खिलारे, अध्यक्ष, भारतीय दलित महासंघ 

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident : भीषण अपघातात बसमधील पाच प्रवासी जळून खाक; ओळख पटवणं झालं होतं मुश्किल, दोघांचं ठरलेलं लग्न अन् काळाचा...

BMC Election: निवडणुकीसाठी महापालिका सज्ज, ५० हजार कर्मचाऱ्यांचे महाप्रशिक्षण सुरू

Latest Marathi News Live Update : संजय शिरसाट यांच्या मुलानंतर आता मुलगीही निवडणूकीच्या रिंगणात, उमेदवारी अर्ज दाखल

Nanded News : वाह रे पठ्ठ्या... आठ वर्षांत १६ ब्रेकअप... तरी नव्या पार्टनरच्या शोधात!

Crime News : लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईत नोकरी लागल्याचं कारण सांगून तिला नेलं अन् तिच्यासोबत...

SCROLL FOR NEXT