सोलापूर

आता "या' आजारांच्या प्रतिबंधसाठी आरोग्य विभाग सतर्क 

सकाळ वृत्तसेवा

पंढरपूर (सोलापूर) : कोरोनाबरोबरच आता डेंगी, हिवताप, मलेरिया यासारख्या पावसाळ्यातील साथीच्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यादृष्टीने नगरपालिकेतर्फे शहर व उपनगरात उपाययोजना सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शहरात विविध भागात गप्पी माशांची 25 पैदास केंद्रे तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती नगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी आज "सकाळ'शी बोलताना दिली. 

नगरपालिकेतर्फे कंटेनर सर्वेक्षण 
डेंगी व मलेरिया यासारख्या जीवघेण्या आजाराची साथ पसरू नये यासाठी नगरपालिकेच्या वतीने नागरिकांचे समुपदेशन करून त्यांना साथीच्या आजाराबाबत माहिती देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वीच नगरपालिकेतर्फे कंटेनर सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणादरम्यान स्वच्छता राखण्याचे आवाहन शहरातील सर्व नागरिकांना केले आहे. 

गप्पी माशांची 25 पैदास केंद्रे 
पावसाळ्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. त्यातून डेंगी, मलेरिया, हिवताप यासारखे साथीचे आजार होतात. साथीचे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी गप्पी माशांचा प्रभावीपणे वापर केला जातो. जास्ती गप्पी माशांची पैदास करण्यासाठी नगरपालिकेने विविध भागांत गप्पी माशांची 25 पैदास केंद्रे तयार केली आहेत. यामध्ये लाखो गप्पी माशांची पैदास केली जात आहे. हे गप्पी मासे शहरातील नागरिकांना देण्यात येणार आहेत. 

शहरातील काही भागांत पाहाणी 
दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्षा साधना भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी शहरातील काही भागांत फिरून पाहाणी केली. यावेळी सांडपाण्याच्या ठिकाणी अळ्या आढळून आल्या. त्या ठिकाणी तत्काळ टेमीफॉस या अळीनाशक द्रावणाची फवारणी करण्यात आली. साथ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पालिकेचे जीवशास्त्रज्ञ किरण मंजुळ यांच्या मार्गदर्शनाखाली 30 हंगामी कर्मचाऱ्यांमार्फत डासोत्पत्ती स्थानांवर बॅक्‍टीसाइड पावडर व टेमीफॉस औषधांची फवारणी सुरू केली आहे. 

60 जणांची मलेरिया टेस्ट निगेटिव्ह 
मलेरिया साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने रक्त नमुने घेतले जात आहेत. आतापर्यंत सुमारे 60 हून अधिक संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. यामध्ये सर्व रुग्णांची टेस्ट मलेरिया निगेटिव्ह आली आहे. 
- किरण मंजुळ, जीवशास्त्र 

नोटीस देण्याबाबत सूचना 
शहरातील ज्या मिळकतदारांनी अजूनही घरातील सांडपाण्याचे पाइप भुयारी गटारास जोडले नाहीत. त्या घर मालकांना नोटीस देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. 
- विवेक परदेशी, 
सभापती, आरोग्य समिती 

             नागरिकांनी घ्यावयाची काळजी 

  •  घराशेजारी टायर व प्लास्टिक वस्तू ठेवू नयेत 
  •  घराच्या गच्चीवर व अंगणात असलेल्या कुंड्या, मडक्‍यांमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी. 
  •  घरातील व हॉटेलमधील पाण्याच्या हौदात गप्पी मासे सोडावेत. 
  •  फ्रीजच्या पाठीमागील बॉक्‍समध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. 
  •  घरात व परिसरात स्वच्छता राखावी. 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

SCROLL FOR NEXT