covid centre.jpg 
सोलापूर

आता कोरोना विरुध्द लढण्यासाठी सरपंचांना दिले ग्राम समितीचे अध्यक्षपद 

शशिकांत कडबाने

अकलूज(सोलापूर): कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी गावचे सरपंच यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा अध्यादेश जिल्हाधिकारी सोलापूर यांनी जारी केला आहे. या आदेशामुळे माळशिरस पंचायत समितीच्या मागणीला यश आले असल्याचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले. 

जिल्ह्यामध्ये परराज्य व परजिल्ह्यातून येणारे नागरिक रेड झोन, ग्रीन किंवा ऑरेंज झोन मधून येत आहेत. त्यांची सखोल चौकशी करून त्यांना 14 दिवस गृहविलगीकरण कक्षात ठेवण्याची पूर्ण जबाबदारी व अधिकार ग्रामसमितीचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या तलाठी यांच्यावर होती. परंतू एकाच तलाठ्याकडे एका पेक्षा अधिक गावे असल्याने ते काम नीट होत नव्हते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संखेत वाढच झाल्याचे दिसून आले. 

ग्रामीण भागातील कोरोना रोखायचा असेल तर गाव पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे होते. परंतु याबाबत सरपंचांना कोणतेही अधिकार नसल्याने इच्छा असूनही ते कोणतीही कार्यवाही करु शकत नव्हते. माळशिरस पंचायत समितीने माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या सूचनेनुसार गावपातळीवर गावच्या तलाठ्याकडे असणारी ही जबाबदारी गावच्या सरपंचांकडे द्यावी अशी मागणी राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली होती. राज्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता शासनाने तातडीने निर्णय घेवून तलाठ्यांकडे असणारी जबाबदारी ही आता गावच्या सरपंचांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी समिती गठीत करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनाही आदेशाद्वारे कळविले आहे. गावचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत झाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचेही मोहिते पाटील यांनी सांगितले 

आता ग्रामसमिती अशी असेल 
ग्रामसमितीमध्ये गावचे सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष असून तलाठी हे सहअध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे सचिव, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गटाचे अध्यक्ष, सचिव, पोलिस पाटील हे या ग्रामस्तरीय समितीचे सदस्य राहणार असून ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर सदस्य सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.  

संपादनः प्रकाश सनपूरकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकलचा खोळंबा, प्रवाशांचा संताप! मुंबईकडे जाणारी ट्रेन ४० मिनिटं लेट, बदलापूर स्टेशनवर उसळली गर्दी

अहिल्यानगर हादरलं! 'अपहरणानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार'; युवतीला मदतीचा बहाणा करून दुचाकीवर बसवलं, ती रडत हाेती अन्..

Kolhapur Politics : पंचायत समिती आरक्षण सोडतीवेळी प्रशासनाची चूक, माजी जिल्हा परिषद सदस्याचा बीपी झाला लो अन्...

Pune Accident: बड्डेच्या शुभेच्छा ऐवजी अंत्यसंस्काराची वेळ! 'दुचाकी खोल खड्ड्यात कोसळून दोन तरुणांचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना

Latest Marathi News Live Update : महसूल सेवकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित

SCROLL FOR NEXT