सोलापूर

आता ऑनलाइन व्यसनमुक्ती चळवळ सुरू .

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर: राज्य शासनाचा मद्य विक्रीचा मुद्दा गाजत असताना, मद्याच्या वाईट परिणामांपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी अल्कोहोलिक्‍स ऍनानिमस (एए) या आंतरराष्ट्रीय व्यसनमुक्ती संघटनेने देखील पुढाकार घेत ऑनलाइन व्यसनमुक्ती चळवळ सुरू केली आहे. एकूण 200 ऑनलाइन व्यसनमुक्ती सभांना मोठा प्रतिसाद मिळतो आहे. 

लॉकडाउनमध्ये मद्य विक्रीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. मद्य विक्रीतून मोठ्या प्रमाणात कर मिळतो म्हणून मद्य विक्रीला सुरवात झाली. त्यानंतर ऑनलाइन मद्य विक्री करण्याबाबत देखील तयारी झाली होती. मध्यंतरीच्या काळात लॉकडाउनमुळे मद्य विक्री बंद होती. या काळात व्यसनाच्या आहारी गेलेल्या काही मद्यपींच्या बाबतीत अनेक प्रकारच्या घटना घडल्या. त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक हेल्पलाइन सुरू केली आहे. 

मुळातच मद्यपींनी व्यसनातून मुक्त व्हावे यासाठी अल्कोहोलिक्‍स ऍनानिमस (एए) या जागतिक संघटनेने देखील ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध केले आहे. या संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात व्यसन सोडण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींसाठी विविध बैठकांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. सोलापुरात देखील अशा प्रकारच्या बैठका होत असतात. मात्र कोरोना संकटात कोणत्याच बैठका घेणे शक्‍य नाही. पण मद्यपींना व्यसनमुक्तीचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने संघटनेने प्रत्येक राज्यामध्ये ऑनलाइन मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे. देशभरात अशा प्रकारच्या 200 ऑनलाइन सभा आयोजित केल्या जात आहेत. पूर्वी या कामात ज्यांना मद्याचे व्यसन थांबवण्याची इच्छा आहे, त्यांना सहभागी होता येत असे. मात्र, लॉकडाउनच्या काळात अनेक मद्यपींना मद्य न मिळाल्याने त्यांचे व्यसन थांबले आहे. त्यांच्यासाठी पुढील काळात देखील मद्यापासून दूर राहता यावे यासाठी देखील या ऑनलाइन सभेमध्ये मार्गदर्शन केले जात आहे. सोलापुरातील मद्यपींसाठी देखील मोबाईल क्रमांक 9922828499 व 9604023847 वर ऑनलाइन सभेच्या सूचना उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ए. एस. ट्रेडर्सचा एजंट बनून कोट्यवधींची कमाई करणारा कोण आहे गोल्डनमॅन? ग्रामपंचायत निवडणुकीत पडलीत फक्त 190 मतं

Mahindra XUV 3XO RevX : कमी किंमत...स्मार्ट फीचर्स, महिंद्राच्या सर्वांत स्वस्त SUV चा स्पोर्टी अवतार लाँच

Latest Marathi News Updates : दादरमधील हायप्रोफाईल शाळेतील प्रकरणाला भलताच ट्विस्ट; शिक्षिकेने विद्यार्थ्याबरोबर केलेला गैरव्यवहार

प्राजक्ता माळी-महेश मांजरेकरांनी जिंकली फिल्मफेअरची बाजी! 'पाणी', 'फुलवंती'चाही डंका

सुरू झाला Amazon Prime Day सेल; स्मार्टफोन, फ्रिज, AC अन् इतर इलेक्ट्रॉनिक्सवर 80% पर्यंत डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर..

SCROLL FOR NEXT