rop vatap.jpg
rop vatap.jpg 
सोलापूर

आपट्याच्या झाडांची रोपे वाटप करून साजरा केला दसरा

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः विजया दशमीचे औचित्य साधून येथील निसर्गप्रेमी अजित चौहान व त्यांच्या कुटूंबियांनी येथील स्मृती वनामध्ये आपट्याच्या झाडांची 45 रोपे भेट स्वरुपात वाटप केली. 

दरवर्षी आपण आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना वाटून शुभेच्छा देतो ही परंपरा आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्याचे कचऱ्यामध्ये रुपांतर होते. काहीजण तर अक्षरशः त्या आपट्याच्या पानांना जाळून टाकतात. म्हणजे त्या पानांनी शोषलेला Co2 परत वातावरणात मिसळतो. ही झाडे जर आपण तोडली नसती तर पक्ष्यांनी या झाडावर घरटी बांधून नविन पिढी वाढवली असती. एक झाड म्हणजे जैवविविधतेचे भांडार असते. त्यावर अनेक किटक, फुलपाखरे, पक्षी, प्राणी व मनुष्य यांचे जीवन अवलंबून असते. पण दरवर्षी दुर्दैवाने आपण जुन्या रीती सांभाळत आपटा, कांचनार आणि अंजन या झाडांची हत्या करतो.हे कुठे तरी थांबायलाच पाहिजे.दरवर्षी आपण ही चूक करतो. 
याच अनुषंगाने आज निसर्ग मित्र अजित चौहान यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी संयुक्ता चौहान यांच्या 45 व्या वाढदिवसानिमित्त 45 आपटयांच्या झाडांची रोपे निसर्गप्रेमींना भेट स्वरूपात देऊन एक आगळा-वेगळा दसरा साजरा केला. 

सोलापूरातील निसर्गरम्य अशा स्मृती वनांमध्ये हा कार्यक्रम निसर्गप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण श्री. टी. व्ही. जाधवर साहेब म्हणाले की, आज आपल्याकडे वृक्ष संवर्धनाबाबत लोकांमध्ये चांगली जनजागृती झाली आहे. पण यासोबतच एखादे वृक्ष जर कोणी तोडत असेल तर त्याची कल्पना वनविभागाला देणे किंवा ते वृक्ष तोडण्यापासून त्यांना परावृत्त करुन त्यांचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळेस नमूद केले. या वेळेस उपस्थित निसर्गप्रेमींना प्रत्येकी आपट्याचे रोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास निसर्गप्रेमी संतोषभाऊ धाकपाडे, पंकज चिंदरकर, सुरेश क्षिरसागर, महादेव डोंगरे, विनय गोटे, अजय हिरेमठ, किरण माने, सिद्धांत चौहान, रुद्रप्रताप चौहान उपस्थित होते.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT