अवैध वाळू उपसा 
सोलापूर

विना परवाना वाळू उपसा कारवाईत एक कोटी 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

दत्तात्रय खंडागळे, सांगोला

या कारवाईत पोलिसांनी तीन जेसीबी, सहा ट्रॅक्‍टर, सहा ब्रास वाळू असा एक कोटी 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सांगोला (सोलापूर): पोलिसांनी कोळा ते शेटफळे रोडवरील देशमुख वस्ती जवळील ओढ्यात विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करत 9 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तीन जेसीबी, सहा ट्रॅक्‍टर, सहा ब्रास वाळू असा एक कोटी 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशानुसार पोलिस गस्त सुरू असताना कोळा ते शेटफळे रोडवरील देशमुख वस्तीजवळील किशोर तोडकरी यांच्या शेतातील ओढ्यात वाळू माफिया जेसीबीच्या सहाय्याने विनापरवाना वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता तीन जेसीबी व सहा ट्रॅक्‍टरच्या वाळू उपसा सुरू असल्याचे दिसून आले.

या कारवाईत पोलिसांनी मच्छिंद्र ज्ञानू सांगोलकर (रा. तिप्पेहाळी), सुनील राम जाधव (रा. फुलवाडी, ता. तुळजापूर), बबन मनोहर राठोड (रा. मुस्ती, ता. द.सोलापूर), सचिन मारुती गडदे (रा. गौडवाडी), महादेव तानाजी देशमुख, मल्हारी भीमराव मोहिते, लक्ष्मण तानाजी माने, जगन्नाथ नामदेव सरगर, अक्षय नारायण सरगर (सर्व रा. कोळा) यांना ताब्यात घेतले. एम.एच.45 ए.डी. 8427, एम.एच.45 ए.डी.8428, एम.एच.45 ए.एल.3043 असे प्रत्येकी 20 लाख रुपये किमतीचे एकूण 60 लाखांचे तीन जेसीबी, एम.एच. 45 एस 3633, एम.एच.45 एस. 2858, एम.एच. 45 ए.एल. 0916, एम.एच.45 एफ 7213, एम.एच.45 एफ 8274, एम.एच. 10 ए.यु.1852 असे प्रत्येकी 7 लाख रुपये किमतीचे 42 लाखांचे सहा ट्रॅक्‍टर, 24 हजार रुपयांची सहा ब्रास वाळू असा एक कोटी 2 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सिध्दनाथ शिंदे यांनी वरील सहा जणांविरुद्ध सांगोला पोलिसांत फिर्याद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update : श्री संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची शिकार प्रकरण उघड; 6 आरोपी ताब्यात

Pimpri Chinchwad News : महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमुळे रुग्णांना कमी खर्चात मिळतात उत्तम उपचार

SCROLL FOR NEXT