Corona Update 
सोलापूर

कोरोना : करमाळा शहरात एकाचा मृत्यू; आतापर्यंत 25 जणांना लागण 

अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्‍यात आज एका 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नवीन पॉझिटिव्ह सर्व तिन्ही रुग्ण पुरुष असून, करमाळा शहरातील आहेत. आतापर्यंत एकूण 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

करमाळा शहर व तालुक्‍यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर नागरिकांनी गर्दी टाळावे, असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती महसूल विभागात मंडल अधिकारी म्हणून कार्यरत होती. त्यामुळे करमाळा तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची व तलाठी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 

याबाबत अधिक माहिती देताना तहसीलदार समीर माने यांनी सांगितले की, करमाळा शहर व तालुक्‍यातील 101 जणांची तपासणी अँटिजेन रॅपिड टेस्टिंग किटद्वारे करण्यात आली. यातील 25 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील करमाळा शहरातील एका व्यक्तीचा बार्शी शहरात उपचार घेत असताना कोरोना संसर्ग व पूर्वीचे मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांमुळे शनिवारी (ता. 18) पहाटे मृत्यू झाला आहे. 

अलीकडील काळात रूग्णांची संख्या वाढत असली तरी लोकांनी स्वयंशिस्त पाळावी. रॅपिड अँटिजेन टेस्टची संख्या तालुक्‍यात वाढविण्यात येणार आहे. प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी करावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. करमाळा शहरातील मेनरोड, वेताळ पेठ, सुमंत नगर, मंगळवार पेठ, सिद्धार्थनगर भाग सील करण्यात आले आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT