1fund_7.jpg 
सोलापूर

रोजगार हिरावला ! बचत गटांच्या दहा लाख महिला बेरोजगार 

तात्या लांडगे

सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ व बॅंकांच्या मदतीने गावगाड्यातील महिलांनी उद्योग क्षेत्रात आघाडी घेतली. 'चूल अन्‌ मूल' ही मर्यादा ओलांडून बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण महिला आता अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात पोहचल्या आहेत. मात्र, कोरोना या वैश्‍विक संकटाला हद्दपार करण्याच्या हेतूने बचत गटांनी हातावर पोट असलेल्या तब्बल दहा लाखांहून अधिक महिलांना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. 


राज्यभरात एक लाख 52 हजार 827 बचत गटांची नोंदणी असून त्यामध्ये तब्बल 27 लाख 39 हजार महिला सभासद आहेत. दरमहा सरासरी साडेसहा कोटींची उलाढाल असलेल्या बचत गटांच्या वस्तू महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पोहचल्या आहेत. तसेच अमेरिका, ऑस्ट्रोलिया, ब्रिटनमध्येही बचत गटांच्या विविध वस्तूंना मागणी असते. मात्र, मागील काही दिवसांपासून देशभर कोरोनाच्या संकटामुळे बचत गटांचा गावगाडा बंद पडला आहे. 55 टक्‍के बचत गटांच्या महिला कोरोनाच्या भितीने व सरकारच्या आवाहनानुसार घरीच बसल्या असून गावातच विक्री होईल, अशा वस्तूंचे उत्पन्न कमी प्रमाणात सुरु ठेवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तब्बल 100 कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. मार्चएण्डमुळे अधिक व्याजदर अथवा दंड लागू नये म्हणून बॅंकांमध्ये कर्जाची रक्‍कम भरण्यास जाणाऱ्या महिलांना सवलत देण्याची मागणी महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे यांनी केली आहे. 


कोरोना हद्दपार व्हावा : बचत गटांचा व्यवसाय ठप्प 
बचत गटाच्या माध्यमातून मसाले निर्मितीचा व्यवसाय सुरु केला. त्यासाठी आठ- दहा महिलांना रोजगार मिळाला, मात्र कोरोनामुळे व्यापार ठप्प झाल्याने त्यांना घरीच बसायला सांगितले. पुणे, मुंबई, बारामती, नंदूरबार येथे मसाले विक्री होत होती, परंतु आता बंद आहे. 
- सरिता माने, पिरळे (ता. माळशिरस), सोलापूर 


महिला कामगार केले कमी 
बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या स्कूल बॅग्ज्‌ पंढरपूर, बार्शी, टेंभूर्णी, अकलूज, इंदापूर, कुर्डूवाडीसह अन्य ठिकाणी घाऊक विक्री होते. त्यासाठी पाच-सहा महिला कामाला होत्या. मात्र, आता कोरोनामुळे सर्वत्र बंदी असल्याने त्यांना घरी बसायला सांगितले असून उलाढाल सध्या ठप्पच आहे. 
- सुष्मा अहिरे, वेळापूर (ता. माळशिरस), सोलापूर 


राज्यातील बचत गटांचा पसारा 
एकूण बचत गट 
1.52 लाख 
महिला सभासद 
27.39 लाख 
दरमहा उलाढाल 
सरासरी 6.40 कोटी 
रोजगाराअभावी घरी बसलेल्या महिला 
10.32 लाख  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D-Mart मध्ये शॉपिंगची तयारी करताय? आधी हे वाचा... नाहीतर खिसा होणार रिकामा! मुंबईतील धक्कादायक प्रकाराने सगळे हैराण

Google Maps : गुगल मॅपमध्ये गेमचेंजर फीचरची एन्ट्री; ट्रॅफिक, छुपे कॅमेरे अन् लँडमार्कची अचूक माहिती..कसं वापरायचं? पाहा एका क्लिकवर

Nashik Election : "सर्वांत मोठा भ्रष्टाचार म्हणजे मतचोरी" : नाशिक काँग्रेसचा 'वोट चोर, गद्दी छोड' अभियानातून भाजपवर हल्लाबोल

Kolhapur Crime News : धक्कादायक! रिक्षाचालकाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड; पालकांनाही धमकी, कोल्हापूरात खळबळ

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

SCROLL FOR NEXT