सोलापूरः देशभरात लॉकडाउनमुळे सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली व मंदिरे देखील उघडण्यात आली आहेत. मात्र पंढरपूरचे विठ्ठल- रुक्मिणी मंदिर अद्याप उघडले नाही. केवळ वारकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा अ. भा. वारकरी महामंडळाने दिला आहे.
हेही वाचाः जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे प्रत्येक महिन्याला वारीनिमित्ताने लाखो वारकरी येतात. वारी हा वारकऱ्यांचा प्राण आहे. "पंढरीची वारी आहे माझे घरी, आणिक न करी तीर्थ व्रत' या विचाराप्रमाणे वारकरी वारी करत असतात. त्यामुळे आषाढी वारीला निष्ठावान वारकरी नित्यनेमाने पंढरपूरला येत असतात. त्यांना नगर प्रदक्षिणा करण्यासाठी शासनाने अधिकृत परवानगी देऊन सहकार्य करावे. परवानगी न घेता वारकरी पंढरपूरला आले आणि शासन प्रतिबंध करू लागल्यास काही अनर्थ घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार शासन व अधिकारी असतील.
हेही वाचाः सोयाबीन व तूर बियाणे दरवाढीचा फटका
तसेच भारतातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली आहेत व बाजारपेठादेखील खुल्या केल्या आहेत. सर्वजण देशाच्या कोणत्याही भागात ये- जा करू शकतात. तर पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर बंद का ठेवले आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. काही नियम व अटी घालून हे मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशा मागणीचे निवेदन अ. भा. वारकरी महामंडळाने केली आहे. ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
भारतातील सर्व प्रार्थनास्थळे, मंदिरे, मशीद आदी सुरू केले आहेत; तर पंढरपूरचे मंदिर बंद कशासाठी ठेवले आहे? हा वारकरी परंपरेवर अन्याय आहे. केवळ पंढरपूरचे वारकरी डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे असे वाटते. हे सहन केले जाणार नाही. त्यामुळे मंदिर दर्शनासाठी खुले करावे. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा; अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असे निवेदन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, जिल्हाध्यक्ष ह.भ.प. जोतिराम चांगभले व शहराध्यक्ष ह.भ.प. संजय पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.