आमदार कैलास पाटील esakal
सोलापूर

Osmanabad : कैलास पाटील यांच्या उपोषणामुळे संघटना ‘रिचार्ज’

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा : उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपोषणाच्या मार्गाने दिलेला लढा जिल्ह्यातील संघटनेला चांगलीच ऊर्जा देणारा ठरल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या पूर्ण करून घेण्यात कैलास पाटील जसे यशस्वी झाले.

तसेच पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टीने देखील त्यांचे आंदोलन कामी आल्याचे दिसत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून नेमकी मागणीचे मुद्दे व त्यातून त्याला कसे यश मिळाले हे सांगण्यासाठी शिवसैनिकांची फळी आता गावोगावी तयार झाली आहे.

कोणत्याही पक्षाची संघटना मजबूत ठेवणे हे अत्यंत कठीण काम असते, त्यातही शिवसेनेमध्ये पडलेली मोठी फूट याने ठाकरे गटाला मोठे आव्हान निर्माण झाले होते. अशा काळात ही संघटनेमध्ये काहीशी मरगळ आल्याचे दिसून आले होते, प्रस्थापितांविरोधात लढणे ही शिवसेनेची खरी ओळख होती.

मधल्या काळात शिवसेना काही नेत्यांच्या मनावर चालत असल्याचे चित्र तयार झाले होते. उशिरा का होईना पक्षातील खरे निष्ठावंत कोण याची मांडणी करणे सगळ्यांनाच सोयीचे ठरत आहे. त्यातच बंडाच्यावेळी कैलास पाटील यांनी ठाकरे घराण्याशी दाखविलेली निष्ठा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातसुद्धा चर्चेला आली.

त्यामुळे ठाकरे गटाच्या निष्ठावंत शिवसैनिकांसाठी कैलास पाटील व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दोघे मोठा आधार ठरली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी विधीमंडळात तर कधी न्यायालयात व सरतेशेवटी स्वतः आमरण उपोषण करून फोडलेली वाचा यामुळे शिवसैनिकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

योग्यवेळी योग्यप्रकारे भूमिका घेऊन कैलास पाटील व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर काम करत असल्याची भावना आता निर्माण होऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम पक्षीय संघटनेमध्ये जी मरगळ आली होती,ती झटकून कार्यकर्तेही जोमाने कामाला लागल्याचे दिसून आले आहे.

नेत्यांमध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता असेल तर संघटन मजबूत होण्यात अडचण येत नाही. सध्यस्थितीला शिवसेनेसारख्या आक्रमक पक्षाने उपोषणासारखा गांधीवादी मार्ग निवडला व त्याला इतर पक्षाचा मिळालेली पाठिंबा हे या आंदोलनाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे.

स्थानिक पातळीवर होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला मिळालेली ही शक्ती मते खेचण्यात किती कामाला येते हे पाहावे लागणार आहे. पण शिवसैनिकांना एक चांगला कार्यक्रम दिल्यास तो किती मोठ्या प्रमाणावर यशस्वी करू शकतो याची साक्षच या आंदोलनातून दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT