latur plastic har newes esakal
सोलापूर

Osmanabad : उस्मानाबाद बाजारपेठेत प्लास्टिकचा बोलबाला

दीपावलीच्या पार्श्‍वभूमीवर आवक वाढल्याने कृत्रिम हारांना अधिक मागणी

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : खरीप २०२० ची पिकविमा योजनेतील सरकारचा प्रलंबित हिस्सा २२० कोटी बजाज अलांयन्स विमा कंपनीकडे वर्ग न करता जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करावी व कंपनीकडील प्रलंबित १४० कोटी पिकविम्याची नुकसान भरपाई वसूल करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

खरीप हंगाम २०२० मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांनी,दोन लाख ९५ हजार २३७ हेक्‍टर क्षेत्राकरीता पिकविमा योजनेत सहभाग घेतला होता. खरीप हंगामात अतिवृष्टी होवून शेतीपिकाचे आतोनात नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने राज्य शासनाने एसडीआरएफ व एनडीआरएफमार्फत शेतकऱ्यांना मदत केली होती.

मात्र या हंगामात विमा कंपनीने ऑनलाईन तक्रारी शेतकऱ्यांनी वेळेत दिला नसल्याने अनेक शेतकरी पिकविम्याच्या नुकसानीपासून वंचित ठेवले होते. त्या अनुषंगाने काही पात्र शेतकरी उच्च न्यायालयात पिकविमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने याचिका मान्य करुन, पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे विमा कंपनीला आदेश दिले होते. त्यानंतर विमा कंपनीने याचिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील उच्च न्यायालयाचाच आदेश कायम ठेवला, विमा कंपनीला तीन आठवड्यात नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना वाटप करावी असे आदेश दिले. विमा कंपनीने आज केवळ २०१ कोटींचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला असून उर्वरित ३३० कोटी व पुर्वीची मंजूर ३० कोटी रक्कम देण्यास विमा कंपनी वेळकाढूपणा करत आहे.

त्या अनुषंगाने २०२० च्या खरीप हंगामापोटी बजाज अलांयन्स इंन्शुरन्स कंपनीला वर्षीच्या हिस्स्यापोटी देण्यात येणारी २२० कोटी रक्कम विमा कंपनीकडे वर्ग न करता जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे जमा करावी व कंपनीकडे प्रलंबित राहणारी १४० कोटी रक्कम अशी एकूण ३६० कोटी बजाज अलायंन्स कंपनीकडून वसूल करावी, जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करावी अशी पत्राद्वारे मागणी कृषि आयुक्त यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT