health news esakal
सोलापूर

Osmanabad : ‘मानसोपचारांच्या चळवळीची समाजाला गरज’

‘मानसिक प्रथमोपचार’ पुस्तकाचं प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘धकाधकीच्या जीवनात नातेसंबंधातील तणाव, नोकरी-व्यवसायातील अपयश, वेगवेगळ्या आपत्तींमुळे होणारे खच्चीकरण यामुळे मानसिक आरोग्य खालावत चालले आहे. त्यातून समाजासमोर अनेक नवे प्रश्न निर्माण झाले असून त्यातून सुटण्यासाठी मानसोपचारांच्या व्यापक चळवळीची समाजाला गरज आहे,’’ असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी चर्चासत्रामध्ये व्यक्त केले.

‘सकाळ प्रकाशन’तर्फे डॉ. प्रतिभा देशपांडे लिखित ‘मानसिक प्रथमोपचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त चर्चासत्रात राज्याच्या साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्यामला वनारसे, डॉ. प्रदीप पाटकर, डॉ. मुकुंद करंबेळकर सहभागी झाले होते.

डॉ. आवटे म्हणाले, ‘‘जागतिक आरोग्य संघटनेने नोंदविलेल्या आकडेवारीनुसार भारतात १४ कोटी लोकांना मानसिक आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. त्यातील सुमारे एक कोटी जणांचे मानसिक प्रश्न तीव्र आहेत. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची संख्या मात्र नऊ हजार आहे. त्यादृष्टीने या विषयावरील पुस्तकांचे स्वागत करणे आवश्यक आहे.’’डॉ. वनारसे म्हणाल्या, ‘‘सामूहिक आनंदापेक्षा वैयक्तिक सुख-दु:खांना दिले जाणारे अवास्तव महत्त्व एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करते. मानसिक स्वास्थ्याची सुरुवात ही एकमेकांना साथ देण्यापासून होते. त्यामुळे मनुष्याला एकमेकांशी जोडणारी चळवळच तयार व्हायलाहवी.

डॉ. पाटकर म्हणाले, ‘‘सहवेदना, सहानुभूती, मदत, ऐकणे, जोडणे, पाहणे, सल्ला आणि स्पर्श याद्वारे मानसिक उपचार करता येतात. कोणत्याही आपत्तीनंतर मानसिक आरोग्य जपण्याविषयी जागरूकता आणि उपचारपद्धतींची अत्यंत गरज असते.

डॉ. करंबेळकर हे प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ असून चाळीसगाव येथे आलेले विविध अनुभव त्यांनी यावेळी मांडले. मित्रत्वाच्या नात्याने मानसोपचार करणारे तज्ज्ञ निर्माण व्हावेत, हा पुस्तकाच्या लेखनामागचा हेतू असल्याचे डॉ. देशपांडे यांनी पुस्तकाबद्दल बोलताना सांगितले. ‘सकाळ प्रकाशना’च्या दीपाली चौधरी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शुचिता नंदापूरकर-फडके यांनी सूत्रसंचालन केले.

पुस्तकाविषयी....

मानसिक प्रथमोपचाराचे स्वतंत्र विज्ञान आहे आणि ती एक कलाही आहे. समुपदेशक डॉ. प्रतिभा देशपांडे यांनी शास्त्र व या कलाकौशल्याची नेमकेपणाने मांडणी या पुस्तकामध्ये केली आहे. आपल्या मनाचे व्यवस्थापन कसे करावे, याचे साध्या-सोप्या भाषेत मार्गदर्शन यामध्ये केले आहे. ‘गोल्डन मानसशास्त्रीय प्रथमोपचार’ या लेखिकेच्या खास उपचारपद्धतीचे विस्तृत वर्णन यात केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT