Oxygen Express SYSTEM
सोलापूर

ओरिसावरुन आज येणार ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस !

तात्या लांडगे

जिल्ह्यातील रूग्णांसाठी ऑक्‍सिजनची मोठी गरज भासत असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय आयुक्‍तांकडे ऑक्‍सिजनची मागणी नोंदविली जात आहे. आता ओरिसावरून येणाऱ्या ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसमधून जिल्ह्यासाठी काही टॅंकर मिळणार असल्याने ही गरज भागेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

सोलापूर : जिल्ह्यासाठी आज (बुधवारी) ओरिसा (orissa) ऑक्‍सिजन एक्‍स्प्रेस (Oxygen express) येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे (Resident Deputy Collector Bharat Waghmare) यांनी दिली. जिल्ह्यासाठी अंदाजित आठ टॅंकर (Eight tankers) मिळण्याची शक्‍यता आहे. (Oxygen express will arrive from orissa today for solapur district)

शहरातील रूग्णंसख्या कमी होऊ लागली, परंतु ग्रामीण भागाची चिंता कायम आहे. ग्रामीण भागात दररोज सरासरी दोन हजारांहून अधिक रूग्ण आढळत आहेत. मृत्यूची संख्यादेखील सरासरी 30 ते 35 आहे. सद्यस्थितीत जिल्हाभरात ऑक्‍सिजनवरील रूग्णांची संख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी दररोज 51 टन ऑक्‍सिजनची मागणी केली जात आहे. तरीही, जिल्ह्यासाठी दररोज 45 टनापर्यंत ऑक्‍सिजन मिळत असल्याने रूग्णांची दररोजची गरज भागत असल्याचेही वाघमारे यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील रूग्णांसाठी ऑक्‍सिजनची मोठी गरज भासत असल्याने मागील काही दिवसांपासून जिल्हा प्रशासनातर्फे विभागीय आयुक्‍तांकडे ऑक्‍सिजनची मागणी नोंदविली जात आहे. आता ओरिसावरून येणाऱ्या ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसमधून जिल्ह्यासाठी काही टॅंकर मिळणार असल्याने ही गरज भागेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस आली अन्‌ गेलीही

मंगळवारी लोणी येथून ऑक्‍सिजन एक्‍सप्रेस सोलापूर स्थानकावर आली. त्यावेळी जिल्ह्याला ऑक्‍सिजन मिळेल, अशी आशा होती. मात्र, काही वेळाच ती एक्‍स्प्रेस पुढे निघून गेली. त्यामध्ये ऑक्‍सिजनचे दोन टॅंकर भरलेले होते. तर चार टॅंकर रिकामेच होते. ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसला ग्रीन कॉरिडॉर दिला असल्याने फक्‍त चालक व गार्ड बदलण्यासाठी ही गाडी काही मिनिटेच सोलापूर स्थानकावर थांबली होती. रेल्वेच्या खुल्या वॅगनवरुन ऑक्‍सिजनच्या टॅंकरची वाहतूक केली जात आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजून सात मिनिटांनी वाडी स्थानकावरून ती रेल्वे आठ टॅंकर घेऊन तामिळनाडूकडे रवाना झाली आहे. मात्र, पुन्हा कोणत्या मार्गाने ही एक्‍सप्रेस येणार अथवा जिल्ह्यासाठी किती टॅंकर ऑक्‍सिजन मिळणार, याबद्दल रेल्वे प्रशासनाने तोंडावर बोट ठेवले. त्यामुळे आज (बुधवारी) येणाऱ्या रेल्वेतील किती टॅंकर ऑक्‍सिजन जिल्ह्याला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

ऑक्‍सिजनची वाहतूक करताना वेग आणि सुरक्षेचा ताळमेळ

क्रायोजेनिक अँकरच्या माध्यमातून ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसची वाहतूक सुरू आहे. ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसच्या सुरक्षेसाठी त्या गाडीचा वेग ताशी 50 ते 60 किमी निश्‍चित केला आहे. लिक्‍विड स्वरुपातील ऑक्‍सिजनची वाहतूक करताना वेग आणि सुरक्षेचा ताळमेळ घालावा लागतो.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे

(Oxygen express will arrive from orissa today for solapur district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Missing Link: मिसिंग लिंक अपघाताआधी काय घडलं? किरकोळ अपघातामुळे २ मार्गिका बंद, वाहनांनी अचानक लेन बदलताच फॉर्च्युनरची ट्रकला धडक

Latest Marathi News Live Update : "मोदी गद्दारांना सांगतायत, भीऊ नका मी पाठीशी"- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT