metan foundation.jpg 
सोलापूर

डॉ. मेतन फाउंडेशनतर्फे विद्यापीठात होणार ऑक्‍सिजन पार्क 

शाम जोशी

दक्षिण सोलापूर(सोलापूर)ः डॉ. मेतन फाऊंडेशनच्या माध्यमातून येथील पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठात ऑक्‍सिजन पार्क साकरण्यात येणार असून त्याची सुरवात जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्या हस्ते 140 रोपांच्या लागवडीने झाली. 

यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन उपस्थित होते. 
विद्यापीठात सुमारे 482 एकर परिसरात डॉ. मेतन फाऊंडेशनच्या सहकार्याने ऑक्‍सिजन पार्क साकारण्यात येणार आहे. वृक्षारोपणानंतर त्याचे संगोपन तसेच सुरक्षेची जबाबदारी येथील अधिकारी आणि कर्मचारी घेणार असून काही वर्षांत येथील परिसर निसर्गरम्य होणार आहे. पहिल्या टप्यात या परिसरात पिंपळ, औदुंबर (उंबर), बकुळ, वड, चिंच, जांभूळ, बेहडा, पिंपरन आणि कडुलिंब अशा जातीच्या 140 रोपांची लागवड यावेळी करण्यात आली. 

निसर्ग आणि पर्यावरण विषयावर कार्य करीत मागील दोन महिन्यात दीर्घायुष्य, पर्यावरणास पोषक आणि वन्यजीवनास उपयोगी असणाऱ्या एकूण 450 रोपांची लागवड फाऊंडेशनच्यावतीने विविध ठिकाणी केल्याचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी हा निसर्गोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. मेतन फाउंडेशनचे अभिनदंन आणि कौतुक केले. कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी हा उपक्रम येथे राबवल्याबद्दल फाउंडेशनचे आभार मानले. जिल्हा वन अधिकारी माने यांनी फाऊंडेशनकडून नेहमी निसर्गाविषयी उत्तम कार्य केले जात असल्याचे सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. देबेन्द्रनाथ मिश्रा, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वनक्षेत्रपाल श्री. जाधवर, विदयापीठ अभियंता गिरीश कुलकर्णी, डॉ. मेतन फाऊंडेशनचे महेश बनसोडे, सोमशेखर लवंगे, सिद्धाराम सक्करगी, गिरीश मेतन उपस्थित होते. 

संपादनः प्रकाश सनपूरकर 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT