busstand.jpg
busstand.jpg 
सोलापूर

एसटीत बसलेले प्रवाशी करताहेत कोरोना सुरक्षा नियमांची पायमल्ली 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः मास्क न बांधता स्थानक व एसटीमध्ये बसणे, लहान मुलांना एसटीच्या गर्दीत सोबत आणणे, पान तंबाखू खाऊन थुंकणे असे अनेक कोरोना नियमांच्या विरुध्द बेशिस्तीचे प्रकार एसटी प्रवाशी सर्रासपणे करीत आहेत. प्रवाशांनी कोरोना संकटात घ्यावयाच्या काळजीबाबत भान सोडल्याचा प्रकार दिसू लागला आहे. 

एसटी सेवा सुरू झाली तसे बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची एसटी स्थानकावर गर्दी होऊ लागली आहे. अनेक महिन्यापासून बाहेरगावी जाऊ न शकणारे प्रवासी एसटीने इतर गावी ये-जा करू लागले आहेत. मात्र, त्यासोबत एसटी गाड्यामध्ये या प्रवाशांनी कोरोना संकटाचे भान सोडले आहे. अनेक प्रवासी स्थानकावर सोशल डिस्टन्स न ठेवता बसतात. अनोळखी व्यक्ती ही कोरोना बाधित किंवा रुग्ण संपर्कातील असू शकते याची तमा न बाळगता प्रवासी धोकादायक पध्दतीने सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा ओलांडत आहेत. 
स्थानकावर देखील बेंचवर जागा असताना देखील हे प्रकार सुरू आहेत. अनेक प्रवासी मास्क न घालता स्थानकावर येत आहेत. एकाच ऍटोमधून प्रवासी स्थानकावर येत आहेत. 
एसटीमध्ये देखील या प्रकारची बेशिस्त कायम आहे. सुरवातीला एसटीमध्ये प्रवासी एका सीटवर एक याप्रमाणे बसतात. एकाच कुटुंबातील प्रवासी असतील तर ते एका सिटवर एकपेक्षा अधिक प्रवाशी बसतात. मात्र, काही गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यानंतर वाहकाच्या सूचना न ऐकता एका सीटवर दोघेजण बसत आहेत. मास्क न वापरात एसटीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील वाढतच आहे. 

लहान मुलांना एसटी प्रवासात आणू नये, असे संकेत असताना देखील अनेक प्रवाशी स्वतः व बालकांला मास्क न लावता एसटीमध्ये घेऊन प्रवास करत आहेत. बालकांनी प्रवास करू नये म्हणून अर्धे तिकीट देखील दिले जात नाही. तरी देखील हे प्रवाशी अर्ध्यातिकीटासाठी वाहकाला त्रस्त करत आहेत. बसण्यासाठी जागा नसताना उभे राहून अनोळखी व्यक्तीच्या बाजूला उभे राहून प्रवास करीत आहेत. 
या प्रकाराला वाहक व चालक देखील कंटाळून गेले आहेत. आधीच उत्पन्न नसल्याने आर्थिक अडचणीत असलेले एसटी कर्मचारी या प्रवाशांच्या काळजी न घेण्याच्या प्रकाराबद्दल काही बोलू शकत नाहीत. प्रत्यक्षात सर्व प्रवाशांना एसटीमध्ये सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर व इतर प्रतिबंधात्मक उपायांच्या अटीवर सुरक्षीत प्रवास करण्याच्या नियमाला योग्य तो प्रतिसाद देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.हा प्रकार जेवढा प्रवाशासाठी जेवढा धोकादायक आहे तेवढा एसटी कर्मचाऱ्यांसाठी देखील अडचणीचा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT