मोतीबिंदू Esakal
सोलापूर

मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नाहीत सोयीसुविधा! रुग्णांच्या पुण्याला चकरा

मोतीबिंदू शस्त्रकियेसाठी नाहीत सोयीसुविधा ! रुग्णांच्या पुण्याला चकरा

प्रकाश सनपूरकर

तब्बल पंधरा हजारपैकी 10 हजार रुग्ण पुण्यात एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने नेत्र शस्त्रक्रिया करवून घेतात.

सोलापूर : जिल्हाभरात मोतीबिंदू (Cataracts) नेत्र शस्त्रक्रियांसाठी शासकीय आरोग्य यंत्रणेत पुरेशा सोयीसुविधा नसल्याने या रुग्णांना पुणे (Pune) किंवा खासगी रुग्णालयात जाऊन ही सेवा मिळवावी लागत आहे. अंधत्व निवारणाचा राष्ट्रीय कार्यक्रम (National Blindness Eradication Program) असताना देखील तज्ज्ञ व आधुनिक सुविधांच्या अभावी ही स्थिती झाली आहे. तब्बल पंधरा हजारपैकी 10 हजार रुग्ण पुण्यात एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने नेत्र शस्त्रक्रिया करवून घेतात. (Patients have to rely on Pune city for cataract surgery-ssd73)

सोलापूर हे मेडिकल हब (Medical Hub) म्हणून ओळखले जाते. राज्यातील व परराज्यातील रुग्ण या ठिकाणी अत्यंत कमी खर्चात गुणवत्तापूर्ण उपचार मिळतात म्हणून येत असतात. सोलापूर मेडिकल हबमध्ये अनेक प्रकारचे नामवंत तज्ज्ञ देखील उपलब्ध आहेत. खासगी रुग्णालयात सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रम जिल्ह्यात राबवला जातो. त्यानुसार प्रत्येक रुग्णालयाच्या स्तरावर नेत्रतपासणी शिबिरे घेऊन मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठीच्या रुग्णांची निवड केली जाते. त्यानंतर या रुग्णांवर शस्त्रक्रिया देखील केल्या जातात. त्यासाठी सर्वोपचार रुग्णालयात शस्त्रक्रिया होत असतात. पण प्रत्यक्षात मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या रुग्णांची संख्या खूप अधिक आहे. त्या तुलनेत केवळ तुरळक शासकीय आरोग्य संस्थांमध्ये शस्त्रक्रिया होतात.

आधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेले ऑपरेशन थिएटर त्यासाठी आवश्‍यक आहे. पण सर्व उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांत ही सुविधा नाही. ज्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ही सुविधा आहे तेथे नेत्रशल्य विशारद पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करता येत नाहीत. जिल्ह्याची एकूण लोकसंख्या पाहता शस्त्रक्रियांची गरज खूप अधिक आहे. रुग्णांची ही अडचण ओळखून पुण्याच्या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत जिल्ह्यातील रुग्णांना मोफत शस्त्रक्रियांची सेवा उपलब्ध करून दिली आहे. रुग्णांना पुण्यात नेऊन ही सेवा दिली जाते. ही सेवा अत्यंत चांगली असली तरी स्थानिक शासकीय आरोग्य संस्थांकडून ही शस्त्रक्रिया राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंतर्गत होणे अपेक्षित आहे. पण वाढती रुग्णसंख्या व उपलब्ध सेवा यामध्ये अंतर पडल्याने ही तफावत निर्माण झाली आहे.

शासकीय आरोग्य संस्थेच्या अडचणी

  • अनेक रुग्णालयांत आधुनिक यंत्रणा व ऑपरेशन थिएटर नाहीत

  • ऑपरेशन थिएटर असणाऱ्या संस्थेत शल्यक्रिया तज्ज्ञ उपलब्ध नाहीत

  • गरजू रुग्णांची संख्या खूप जास्त

  • खासगी रुग्णालये व पुण्याच्या संस्थेच्या मदतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया

  • राष्ट्रीय कार्यक्रमाची अंमलबजावणी अडखळली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT