कोरोना काळातही अडीच हजार विद्यार्थ्यांची "ही' शाळा 70 दिवसांपासून आहे अखंड सुरू!
कोरोना काळातही अडीच हजार विद्यार्थ्यांची "ही' शाळा 70 दिवसांपासून आहे अखंड सुरू! Canva
सोलापूर

Solapur : कोरोना काळातही 'ही' शाळा 70 दिवसांपासून आहे अखंड सुरू!

भीमाशंकर राशीनकर

मागील वर्षीही 140 दिवस शाळा चालवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य या शाळेने केले आहे. विशेष म्हणजे, योग्य ती काळजी घेतल्यामुळे इतक्‍या दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही.

अनगर (सोलापूर) : माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली अनगरमधील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (Shankarrao Bajirao Patil Secondary and Higher Secondary School) ही एक विविध उपक्रमांनी सुरू असलेली शाळा आहे. येत्या चार तारखेला सुरू होणाऱ्या शाळांसाठी ही शाळा दीपस्तंभ ठरली आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अडीच हजार विद्यार्थी संख्या असणारी सर्वांत मोठी शाळा. चंद्रकांत ढोले हे आहेत या शाळेचे मुख्याध्यापक तथा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य.

शाळा म्हणजे मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबे खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोडी... मौज... दंगामस्ती... सगळा आनंदी आनंद. पण गेल्या दीड वर्षापासून मुलांचा हा आनंद कोरोनाच्या महामारीने हिरावून घेतला. पण याला अपवाद आहे निसर्गाच्या कुशीत वसलेली येथील शाळा! ही शाळा एक - दोन दिवस नाही तर तब्बल 70 दिवस अखंडपणे सुरू आहे. मागील वर्षीही 140 दिवस शाळा चालवून ज्ञानदानाचे पवित्र कार्य या शाळेने केले आहे. विशेष म्हणजे, योग्य ती काळजी घेतल्यामुळे इतक्‍या दिवसात एकाही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला नाही. शाळा चालू करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत पाटील व सचिव अजिंक्‍यराणा पाटील यांची प्रेरणा तर गावकरी व पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे श्री. ढोले सांगतात.

जुलै महिन्यात शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्या शिफारशीने शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे परिपत्रक काढले व त्यानुसार संस्थाप्रमुख माजी आमदार राजन पाटील, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी 22 जुलैपासून स्वतःच्या जबाबदारीवर शाळा सुरू केली. आज या शाळेला 70 दिवस पूर्ण झालेले आहेत. सुरवातीला पाचवी व सातवीचे वर्ग कट्ट्यावर, झाडाखाली, मोकळ्या मैदानात व व्हरांड्यात भरवण्यात आले. आज मात्र ही शाळा कोरोनाचे नियम पाळत बिनधास्त भरतेय.

शाळेने अशी घेतली काळजी

  • सर्व शिक्षकांची दोन वेळा rt-pcr कोरोना टेस्ट करण्यात आली

  • सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली व कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली

  • सर्वांचे शाळेच्या गेटवर थर्मल स्कॅनिंग, हॅंडवॉश व सॅनिटायझेशन करण्यात येते

  • सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याकरिता पालकांची संमतिपत्रे घेण्यात आली

  • सर्व वर्ग भरायच्या व सुटायच्या वेळा वेगवेगळ्या ठेवल्या

  • शाळा सुटल्यानंतर वर्ग फवारणी करून सॅनेटायझेशन केले

  • मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले

  • कोरोना प्रबोधनासाठी गावात रॅलीचे आयोजन करून मास्क व पत्रके वाटण्यात आली

गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीत शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वाधिक नुकसान झालेले होते. यापुढे हे शैक्षणिक नुकसान आपणास परवडणारे नाही म्हणून शाळा सुरू करण्यासाठी मी परवानगी दिली. सर्वांनी काळजी घेतल्याने ती आज सुरक्षित चालू आहे.

- राजन पाटील, माजी आमदार, संस्था प्रमुख

संस्थेचे प्रमुख राजन पाटील, ग्रामपंचायत समिती, स्थानिक व्यवस्थापन समिती, शिक्षक- पालक संघ या सर्वांच्या सहमतीने व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने कोरोनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून शाळा सुरू केली व सर्वांच्या सहकार्यामुळे मी ती पूर्ण क्षमतेने चालवू शकलो.

- प्राचार्य चंद्रकांत ढोले, प्राचार्य

शाळा सुरू करण्याचा निर्णय शाळेने घेतला तेव्हा शाळेचे काहीतरी चुकतंय की काय असे वाटले. पण आज मात्र शाळेचा तो निर्णय शंभर टक्के बरोबर होता, असे वाटत आहे. शाळा सुरू झाल्याने मुलांचे नुकसान टळले. त्यामुळे आम्ही पालक खूप समाधानी आहे.

- दत्ता गुंड, पालक, अनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhule Lok Sabha Constituency : मुस्लीम उमेदवारांच्या प्रभावाचीही कसोटी; राजकीय डावपेच कुणाच्या पथ्यावर?

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SCROLL FOR NEXT