coaching class.jpg 
सोलापूर

शाळांच्या धर्तीवर कोचिंग क्‍लासेस सुरू करण्यास द्या परवानगी : पीटीएची मागणी 

प्रकाश सनपूरकर

सोलापूरः कोचिंग क्‍लास च्या प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन (पीटीए) च्या वतीने सोलापुरात शाळा सुरू झाल्या असल्याने त्याच नियमांच्या आधारावर कोचिंग क्‍लासेस सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावेत असे सुचवले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्तांना संघटनेच्या वतीने खालील निवेदन देण्यात आले. 
या वेळी संघटनेचे सेक्रेटरी जव्हेरी, सुनील कामतकर, चंद्रशेखर याबाजी, संजय पाथरकर, शशिकांत कलबुर्गी, घनशाम कदम, श्री. परदेशी, रतन अगरवाल उपस्थित होते या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन त्यांचे प्रश्‍न मांडले. 

सोलापूर शहरात शाळा सुरू झाल्या आहेत. नववी ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांचा मागे पडलेला अभ्यास तातडीने करण्यासाठी कोचिंग क्‍लासेसची मदत लागणार आहे. शाळा सूरू झाल्याने आता कोचिंग क्‍लास सुरू होणे गरजेचे आहे. 
गेल्या आठ महिन्यापासून कोचिंग क्‍लासेस बंद आहेत. त्यामुळे आमच्या शिक्षकांवर व स्टाफवर उपासमारीची वेळ आलेली आहे. आजपर्यंत लॉकडाउनच्या काळातील हॉलचे भाडे, लाईट बिल व इतर खर्च निघाला नाही. 
आता सोमवार (ता.23) पासून नववी ते बारावी शाळा सुरू झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यासाठी नियमावाली (एसओपी) तयार केलेली आहे. त्याच प्रमाणे कोचिंग क्‍लासेस बाबतीत नियमावली तयार करून करून क्‍लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी सर्व कोचिंग क्‍लासेसच्या शिक्षकांची कोरोना टेस्ट, दररोज हॉल सॅनिटायझेशन करून घेणे, विद्यार्थ्यांसाठी थर्मल स्क्रिनींग, हॉलवर सॅनिटायझरचा वापर, एका बाकावर एक विद्यार्थी या सारख्या सर्व नियमाचे पालन केले जाईल. महाराष्ट्र शासनाने घालून दिलेल्या सर्व अटींचे आम्ही तंतोतंत पालन केले जाणार आहे. तरी शिक्षकांची तळमळ लक्षात घेऊन आम्हा क्‍लास सुरू करण्याची परवानगी द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Mobile : एकनाथ शिंदे ब्रिटिश विमानात मोबाईल विसरले, ९ तासांच्या प्रवासानंतर मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं?

IND vs AFG, Viral Video: कर्णधार श्रेयस अय्यरने मालिका जिंकलीच, पण मनंही जिंकली; अफगाणिस्तानच्या कर्णधाराला बोलावलं अन्...

Rahul Gandhi TMC Post : 'आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी आणि आता...'; राहुल गांधींच्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, निवडणूक आयोगाला केलं लक्ष्य

Marathi News Live Updates : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी वर्षा बंगल्यावर घेतले गणरायाचे दर्शन

Gold Rate Today: अमेरिकेने व्याजदर वाढवले अन् एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठा बदल! तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT