वाहने अडवून लुटणारी टोळी जेरबंद ! Sakal
सोलापूर

वाहने अडवून लुटणारी टोळी जेरबंद ! 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

वाहने अडवून लुटणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रीय महामार्गावरील वाहने अडवून, लोकांचे हातपाय बांधून, गाडीचे टायर काढून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांना जेरबंद करण्यात ग्रामीण "एलसीबी'ला यश आले आहे.

सोलापर : राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) वाहने अडवून, लोकांचे हातपाय बांधून, गाडीचे टायर काढून लूटमार करणाऱ्या आंतरजिल्हा गुन्हेगारांना (Interdistrict criminals) जेरबंद करण्यात ग्रामीण 'एलसीबी'ला यश आले आहे. गुन्ह्यातील (Crime) ट्रकच्या 10 डिस्कसह टायर, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल व इतर साहित्य असे एकूण 24 लाख मुद्देमालही जप्त करण्यात आली आहे.

चेन्नई येथून अशोक लेलॅंड कंपनीचे नवीन चेस मिक्‍शर घेऊन सुरत, गुजरात येथे जाण्याकरिता निघाले असता 13 ऑक्‍टोबर रोजी दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कंदलगाव येथे सात ते आठ अनोळखी लोकांनी यातील फिर्यादी अजितसिंग बाबूलाल (रा. भोलडा) यांचे वाहन अडवून त्यांचे हातपाय दोरीने बांधले व रोडपासून अंदाजे 100 मीटर अंतरावर पडीक शेतामध्ये नेऊन गाडीचे 10 टायर डिस्कसह काढून, डिझेल, बॅटरी, टूलबॉक्‍स, मिक्‍शर पाइप तसेच मोबाईल व रोख रक्कम आदी साहित्य जबरदस्तीने काढून घेतले. या अनोळखी लुटारूंनी त्यांच्यासोबत आणलेल्या रोडच्या बाजूस उभा केलेल्या दुसऱ्या एका मोठ्या ट्रकमध्ये हे साहित्य घेऊन गेल्याची घटना घडली.

याबाबत अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेच्या पथकाची नियुक्‍ती केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माधमातून गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पथकाला या गुन्ह्यातील सहा आरोपी हे गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह सोलापूर- तुळजापूर रोडवरील शीतल हॉटेल (ता. उत्तर सोलापूर) जवळ हायवेलगत थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिस निरीक्षक नितीन थेटे, पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व शैलेष खेडकर यांनी पथकासह त्या ठिकाणी जाऊन आरोपींना शिताफीने ताब्यात घेत गुन्ह्यात वापरलेले वाहन व गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. या आरोपींना 30 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून त्यांच्याकडून आणखीन गुन्ह्यांची उकल होण्याची शक्‍यता आहे.

ही धडाकेबाज कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकामार्फत करण्यात आली.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: नोकरीचं स्वप्न भंगलं? सरकारी कॉलेजमधून शिक्षण घेतलं म्हणून...; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल केला रद्द

Marriage Problems: विवाहासाठी योग्य स्थळे का सांगून येत नाहीत? वाचा सविस्तर

Daily Rashi Bhavishya: भाग्य, यश आणि आशीर्वाद! 'या' राशींच्या लोकांनावर असेल शनिदेवाची कृपादृष्टी, वाचा आजच राशीभविष्य

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

SCROLL FOR NEXT