डिझेल
डिझेल Sakal
सोलापूर

बनावट डिझेल! पालघरच्या साई ओम पेट्रोने केमिकल आणले कोठून?

प्रमोद बोडके : सकाळ वृत्तसेवा

या कंपनीने बेकायदेशीर डिझेल बनवण्यासाठी कोणकोणते केमिकल कोठून आणले? याचा तपास सुरू असल्याची माहिती सोलापूरच्या पोलिसांनी दिली.

सोलापूर : पालघर (Palghar) जिल्ह्यातील खुपरी (ता. वाडा) येथील साई ओम पेट्रो स्पेसिलिटीज लिमिटेड या कंपनीला रिसायकल व्यवसायाचा परवाना असताना, त्यांनी केमिकलच्या साह्याने डिझेल तयार करून त्याची विक्री केली. या कंपनीने बेकायदेशीर डिझेल (Illegal diesel) बनवण्यासाठी कोणकोणते केमिकल कोठून आणले? याचा तपास सुरू असल्याची माहिती सोलापूरच्या पोलिसांनी (Police) दिली. या प्रकरणात एकूण 17 कोटी 20 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हैदराबाद- पुणे राष्ट्रीय महामार्गालगत हॉटेल समर्थच्या आकांक्षा लॉजिस्टिकच्या खासगी बसमध्ये डिझेलसदृश ज्वलनशील पदार्थ टाकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकून पोलिसांनी कारवाई करत तानाजी कालिदास ताटे (रा. मानेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर), युवराज प्रकाश पडवळकर (रा. पंचशीलनगर, वैराग, ता. बार्शी), अविनाश सदाशिव गंजे (रा. भवानी पेठ, चडचणकर अपार्टमेंट, सोलापूर), सुधाकर सदाशिव गंजे (रा. अवंतीनगर, पूना नका, सोलापूर), श्रीनिवास लक्ष्मण चव्हाण (अभिषेक नगर, सोलापूर), हाजू लतीफ शेख (रा. कौडगाव, ता. जि. उस्मानाबाद) यांना ताब्यात घेऊन घटनास्थळावरून एक टॅंकर डिझेल व आकांक्षा लॉजिस्टिकच्या तीन बस जप्त केल्या होत्या.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान हिमांशू संजय भूमकर (वय 21, रा. भूमकर कॉलनी, बार्शी रोड, वैराग) यांनी डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ टॅंकर क्रमांक एम. एच. 25 एके 2417 मध्ये पाठविल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक केल्यानंतर डिझेलसारखा ज्वलनशील द्रव कोठून आणला? याबाबत त्यांच्याकडे तपास करण्यात आला. हा पदार्थ द्रवपदार्थ पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्‍यातील खुपरी येथील साई ओम पेट्रो स्पेसिलीटीज कंपनीतून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार सोलापुरातील गुन्हे शाखेची दोन पथके पालघरकडे रवाना झाली होती. त्या कंपनीत वेगवेगळ्या रासायनिक नवनिर्मितीच्या मशिनरी व भेसळ करण्यासाठी यंत्रसामग्री असल्याचे समोर आले. कंपनीची मशिनरी मालमत्तेसह 16 कोटी 19 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT